धावत्या वाहनाने घेतला पेट

By admin | Published: March 29, 2016 02:14 AM2016-03-29T02:14:50+5:302016-03-29T02:14:50+5:30

बुलडाणा-अजिंठा मार्गावरील घटना; वाहनातील चारही शिक्षक सुरक्षित.

Running vehicle has stomach | धावत्या वाहनाने घेतला पेट

धावत्या वाहनाने घेतला पेट

Next

बुलडाणा : शाळेतील ड्युटी संपवून चार शिक्षक ओमनी वाहनाने बुलडाण्याकडे परत येत असताना, त्यांच्या वाहनाने अचानक पेट घेतला; मात्र चारही शिक्षक वाहनातून तत्काळ बाहेर निघाल्यामुळे मोठा अनर्थ टळला. ही घटना २८ मार्च रोजी बुलडाणा-अजिंठा मार्गावर जाळीचा देव परिसरात दुपारी १ वाजता घडली. बुलडाणा येथील अरुण फकिरा राऊत व त्यांची पत्नी जालना जिल्ह्यातील ग्राम धावडा येथील एकाच शाळेवर शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. आज दुपारी १२ वाजता शाळा सुटल्यानंतर इतर दोन सहकारी शिक्षकांबरोबर राऊत पती-पत्नी ओमनी वाहनाने धावडा येथून बुलडाण्याकडे निघाले. दरम्यान, जाळीचा देव-मढ मार्गावर ओमनीने अचानक पेट घेतला. त्यामुळे प्रसंगावधान दाखवत चारही शिक्षक वाहनातून तत्काळ बाहेर निघाले. काही वेळात वाहनाचा जळून कोळसा झाला. घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी आग विझविण्यासाठी घटनास्थळी धाव घेतली. यामुळे काही काळ बुलडाणा-अजिंठा मार्गावरील वाहतून प्रभावित झाली होतो.

Web Title: Running vehicle has stomach

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.