जमीन अधिग्रहणाशिवाय रस्त्याचे काम करू नये - राहुल बोंद्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 12:02 AM2018-01-10T00:02:21+5:302018-01-10T00:06:33+5:30

खामगाव ते चिखली व चिखली ते मेहकर या रस्त्याचा राष्ट्रीय महामार्गामध्ये  समावेश करून सदर दोन्ही रस्ते २४ मीटर रुंदीचे तयार करण्यात येत आहेत.; परंतु  यासाठी या रस्त्याच्या दोन्ही बाजूने असलेल्या शेतकर्‍यांच्या शेतजमिनीचे कुठलेही  अधिग्रहण न करता परस्पर शेती ताब्यात घेऊन त्यावर रस्त्याचे कामकाज सुरू करण्यात  आले आहे, ही बाब अन्यायकारक असल्याने या विरोधात रस्त्याच्या कडेला असलेल्या  शेतकर्‍यांनी आमदार राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वात पालकमंत्री ना.भाऊसाहेब फुंडकर यांना  निवेदन देऊन शेतजमिनीचे कायदेशीर अधिग्रहणानंतर रस्त्याचे काम सुरू करावे, अशी  मागणी केली आहे.  

Road should be done without acquisition of land - Rahul Bondre | जमीन अधिग्रहणाशिवाय रस्त्याचे काम करू नये - राहुल बोंद्रे

जमीन अधिग्रहणाशिवाय रस्त्याचे काम करू नये - राहुल बोंद्रे

Next
ठळक मुद्देबोंद्रे यांच्या नेतृत्वात शेतकर्‍यांचे पालकमंत्र्यांना निवेदनखामगाव-चिखली व चिखली-मेहकर मार्गाचे रुंदीकरण

लोकमत न्यूज नेटवर्क
चिखली : खामगाव ते चिखली व चिखली ते मेहकर या रस्त्याचा राष्ट्रीय महामार्गामध्ये  समावेश करून सदर दोन्ही रस्ते २४ मीटर रुंदीचे तयार करण्यात येत आहेत.; परंतु  यासाठी या रस्त्याच्या दोन्ही बाजूने असलेल्या शेतकर्‍यांच्या शेतजमिनीचे कुठलेही  अधिग्रहण न करता परस्पर शेती ताब्यात घेऊन त्यावर रस्त्याचे कामकाज सुरू करण्यात  आले आहे, ही बाब अन्यायकारक असल्याने या विरोधात रस्त्याच्या कडेला असलेल्या  शेतकर्‍यांनी आमदार राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वात पालकमंत्री ना. भाऊसाहेब फुंडकर यांना  निवेदन देऊन शेतजमिनीचे कायदेशीर अधिग्रहणानंतर रस्त्याचे काम सुरू करावे, अशी  मागणी केली आहे.  
खामगाव ते चिखली व चिखली ते मेहकर या मार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर करून  रस्ता रूंदीकरणाचे काम सुरू आहे.  वस्तुत: सदर डांबरी रस्ता पूर्वी फक्त २0 फूट  रूंदीचा असताना आणि तेवढीच जमीन शेतकर्‍यांनी शासनास दिलेली असताना, सद्यस् िथतीत कुठलेही कायदेशीर अधिग्रहण न करता हा रस्ता रूंद केल्या जातो आहे. 
शिवाय या रस्त्याची बाहेरील प्रकल्पात येणारी जमीन शासन ताब्यात घेणार असल्याची  माहितीही मिळाल्याने शेतकरी वर्गात घबराट पसरली आहे.  सदर चुकीच्या व  बेकायदेशीर अधिग्रहणामुळे शेतकर्‍यांच्या जमिनी फुकट हिरावल्या जात असल्याने हा  अन्याय होऊ नये त्यासाठी शासनाने कायदेशीर जमीन अधिग्रहीत करून शेतकर्‍यांना  त्याचा योग्य मोबदला द्यावा व नंतरच काम सुरू करावे, अन्यथा न्यायालयात कायदेशीर  मार्गाने लढाई लढावी लागेल, असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.  दरम्यान,  आमदार राहुल बोंद्रे यांनी शेतकर्‍यांची व्यथा शासनदरबारी मांडून त्यांना न्याय मिळवून  देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आश्‍वासन दिले. पालकमंत्री ना.फुंडकर यांच्याशी चर्चा  करताना सदर प्रश्नी मंत्रालयात बैठक बोलाविण्याचा आग्रह धरण्याबरोबरच बैठकीत  संबंधित मंत्री महोदयांशी सविस्तर चर्चा करून शेतकर्‍यांचा प्रश्न मार्गी लावण्यात यावा,  असा आग्रह आ.बोंद्रे यांनी धरला असता, पालकमंत्र्यांनी यावर सकारात्मक भूमिका घेत  लवकरच मंत्रालयात बैठक लावण्याचे मान्य केले आहे. यावेळी  खंडाळा मकरध्वज,  मुंगसरी, भालगाव, खैरव, आमखेड, कोलारा, आंबाशी, वैरागड, उंद्री, अमडापूर,  टाकरखेड मुसलमान, कव्हळा, करणखेड, दहीगाव, उत्रादा, पेठ, बोरगाव वसु,  दिवठाणा, सोमठाणा, शिंदी हराळी, शेलुद आदी गावातील शेतकरी उपस्थित होते. 
 

Web Title: Road should be done without acquisition of land - Rahul Bondre

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.