जीव वाचविण्यासाठी प्रवाशांनी तोडल्या बसच्या काचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 07:00 PM2017-10-14T19:00:57+5:302017-10-14T19:01:20+5:30

passengers break bus window glass to save lives | जीव वाचविण्यासाठी प्रवाशांनी तोडल्या बसच्या काचा

जीव वाचविण्यासाठी प्रवाशांनी तोडल्या बसच्या काचा

Next
ठळक मुद्देशॉर्ट सर्कीट झाल्याची अफवा

डोणगाव : येथील बसस्थानकावर औरंगाबाद- नागपूर बस १४ आॅक्टोबरला दुपारी १२.४५ वाजता बसस्थानकावर थांबताच बसमधून धूर बाहेर येऊ लागल्याने बसमध्ये शॉर्टसर्कीट झाल्याच्या अफवा पसरली. त्यामुळे प्रवाशांनी जीव वाचविण्यासाठी चक्क बसच्या काचा फोडून बाहेर उड्या टाकल्या.  
नेहमीप्रमाणे औरंगाबाद बस आगाराची औरंगाबाद-नागपूर बस डोणगाव बसस्थानकावर आली. प्रवाशी उतरत असताना धूर झाल्याने बसमध्ये एकच खळबळ उडाली. बसमध्ये शॉर्टसर्कीट झाले, अशी अफवा पसरल्याने प्रवाशांनी जीव वाचविण्यासाठी बसच्या काचा फोडून प्रवाशी, चालक व वाहक बाहेर पडले. परंतु, धूर कमी झाल्यानंतर बसमध्ये असणारे अग्नीशमन यंत्रावर कुण्यातरी प्रवाशाचा दाब पडल्याने यंत्रातील वायू बाहेर पडला व धूर झाल्याचे निदर्शनास आले. यामुळे तब्बल अर्धातास वाहतूक ठप्प झाली होती.  (वार्ताहर)

Web Title: passengers break bus window glass to save lives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात