राष्ट्रवादीचे मोताळा नगरपंचायत समोर डफडे बजाव आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 06:26 PM2018-05-14T18:26:03+5:302018-05-14T18:26:03+5:30

मोताळा : शहरवासीयांच्या विविध समस्या व अडचणी सोडवण्याच्या मागणीसाठी मोताळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तालुकाध्यक्ष सुनील घाटे यांच्या नेतृत्वाखाली मोताळा नगरपंचायत कार्यलयासमोर सोमवारी डफडे बजाव आंदोलन करण्यात आले.

NCP's Dafda Bajwa movement against Motaila Nagar Panchayat | राष्ट्रवादीचे मोताळा नगरपंचायत समोर डफडे बजाव आंदोलन

राष्ट्रवादीचे मोताळा नगरपंचायत समोर डफडे बजाव आंदोलन

Next
ठळक मुद्दे राष्ट्रवादी काँग्रेसने १६ एप्रिल रोजी नगरपंचायत प्रशासनाला निवेदन दिले होते.शहरातील समस्यांकडे लक्ष न घातल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाच्या शेवटी देण्यात आला आहे.

मोताळा : शहरवासीयांच्या विविध समस्या व अडचणी सोडवण्याच्या मागणीसाठी मोताळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तालुकाध्यक्ष सुनील घाटे यांच्या नेतृत्वाखाली मोताळा नगरपंचायत कार्यलयासमोर सोमवारी डफडे बजाव आंदोलन करण्यात आले. यावेळी नगरपंचायत प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे.
     मोताळा शहरातील विविध समस्या व अडचणी दूर करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने १६ एप्रिल रोजी नगरपंचायत प्रशासनाला निवेदन दिले होते. मोताळा नगरपंचायतला जवळपास अडीच वर्षांचा कालावधी होत आला असून, कर व बांधकाम परवानगीचे दर तत्काळ वाढविण्यात आले. मात्र शहरवासीयांना त्या प्रमाणात सोयी सुविधा मिळत नसल्याचे निवेदनात नमूद आहे. मोताळा येथील नाईक ले-आउट आणि सर्वेश्वर नगर जवळून जाणाºया नाल्यावर संरक्षण भिंत बांधणे, कचरा टाकण्यासाठी डंपिंग ग्राउंडची व्यवस्था करणे, शहरातील जि.प. शाळा नगरपंचायतमध्ये समाविष्ट करणे, शहरवासीयांना शुद्ध व मुबलक पाणीपुरवठा करणे, आठवडी बाजारात वाहतुकीची कोंडी होत असल्याने बायपासची व्यवस्था करणे, शहरातील सर्व बांधकामे नियमित करणे, अल्पसंख्याकांसाठी घरकुलांची व्यवस्था करणे, अपंगांसाठी तीन टक्के निधी व राखीव घरकुलचा लाभ देणे, दलित वस्तीसाठी जास्तीत जास्त निधी आणून कामे करणे यासह विविध मागण्यांचा समावेश आहे. दरम्यान, संबंधितांनी याकडे दुर्लक्ष केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने सोमवारी डफडे बजाव आंदोलन करून नगरपंचायत प्रशासनाला निवेदन दिले. शहरातील समस्यांकडे लक्ष न घातल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाच्या शेवटी देण्यात आला आहे.
     या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नरेश शेळके, तालुकाध्यक्ष सुनील घाटे, जिल्हा सरचिटणीस डॉ. शरद काळे, जिल्हा सचिव सुनील कोल्हे, शहराध्यक्ष आसिफ कुरेशी, भिकन जमादार, रवि पाटील, संजय जवरे, महिला तालुकाध्यक्षा शीतल सरोजकार, लतिका गायकवाड, अहिरे ताई, बुलडाणा शहराध्यक्ष अनिल बावस्कर, सुनील फाटे, शंकर महाराज, शेख शाकिर, दिलीप गायकवाड, सुधाकर सुरडकर, भागवत शिकारे, शेख बादर, सलीम शाह, अमीर शाह, युसूफ शाह, सलिम खाटीक, दीपक सुरडकर, निलेश इंगळे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांचा सहभाग होता. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: NCP's Dafda Bajwa movement against Motaila Nagar Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.