नवरात्रोत्सवही गणेशोत्सवाप्रमाणेच कौटुंबिक स्तरावरच होणार साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2020 01:22 PM2020-10-17T13:22:38+5:302020-10-17T13:22:46+5:30

Navratri festival Buldhana जिल्ह्यातील मोठ्या २५० व्यावसायिकांचा जवळपास १२ कोटी रुपयांचा व्यवसाय त्यामुळे बुडाला आहे.

Navratri festival will be celebrated at family level | नवरात्रोत्सवही गणेशोत्सवाप्रमाणेच कौटुंबिक स्तरावरच होणार साजरा

नवरात्रोत्सवही गणेशोत्सवाप्रमाणेच कौटुंबिक स्तरावरच होणार साजरा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : गणेशोत्सवाप्रमाणेच दुर्गादेवी अर्थात नवरात्रोत्सव हा साध्या पद्धतीने यंदा साजरा करण्यात येणार आहे. कोरोना संसर्गाची वाढती व्याप्ती पाहता प्रशासकीय पातळीवरून दिलेल्या  सुचनांचे काटेकोर पालन करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या आहेत.
दुसरीकडे गणेशोत्सवाप्रमाणेच दुर्गादेवी उत्सवातही मंडप व्यावसायिकांना आर्थिक फटका बसला असून जिल्ह्यातील मोठ्या २५० व्यावसायिकांचा जवळपास १२ कोटी रुपयांचा व्यवसाय त्यामुळे बुडाला आहे. बुलडाण्यातील या क्षेत्रातील मोठे व्यावसायिक असलेले बबन लोणकर यांनीही त्यास दुजोरा दिला आहे. प्रतिदिन किमान पाच हजार रुपये या प्रमाणे या दहा दिवसात हा व्यवसाय होत असतो, असे ते म्हणाले.
दुसरीकडे दरवर्षी जिल्ह्यात  १०१४ मंडळे दुर्गादेवीचीस्थापना करत असता. यामध्ये शहरी भागात ३६८, ग्रामीण भागात ६४६ आणि २६६ गावात एक गाव एक देवी बसविण्यात येत असते. यंदा मात्र ही संख्या कमी होणार असल्याची चिन्हे आहेत. इनडोअर स्तरावर दुर्गादेवीची स्थापना करता येत असली तरी पाच पेक्षा अधीक व्यक्तींना तेथे उपस्थित राहता येणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. दांडीया, गरबा कार्यक्रमांनाही बंदी आहे. सार्वजनिक मिरवणुकांनाही बंदी आहे.

Web Title: Navratri festival will be celebrated at family level

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.