ठळक मुद्देविस्तारीत कार्यकारीणीची झाली बैठक

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलढाणा : नदी, नाले ओढ्यांची साफसफाई, स्वच्छता तसेच भविष्यातील नदीजोड प्रकल्प अभियान गावपातळीवर राबविण्याच्या दृष्टीने केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. दरम्यान, राज्यात २४ हजार कोटी रुपयांची तरतूद या उपक्रमासाठी करण्यात आली आहे. नमामि गंगे अभियानातून जिल्हाभरात जलक्रांती निर्माण होणार असून आपल्या भागातील नदी प्रकल्पाची माहिती तातडीने कळवावी, असे आवाहन भाजपाचे जिल्हा महामंत्री तसेच नमामि गंगे अभियानाचे जिल्हाध्यक्ष विश्वनाथ माळी यांनी पाच नोव्हेंबर रोजी विश्रमागृहावर आयोजित विस्तारीत कार्यकारीणी बैठकीत केले.
या बैठकीला नामामि गंगेचे पश्चिम विदर्भ सह सदस्य शाम देवडे पाटील, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. शिवाजीराव खरात, अरविंद शिंदे, दत्ता पाटील, तसेच जिल्हाभरातील नवनियुक्त पदाधिकारी उपस्थित होते. या प्रसंगी जिल्ह्यातील पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. विश्वनाथ माळी म्हणाले, नामामि गंगे अभियान गाव पातळीवर नदी नाले स्वच्छ करून शेती व शेतकºयांसाठी सिंचन सुविधा तसेच दुष्काळग्रस्त भागात पेयजल संकट दूर करण्यासाठी भविष्यात नदीजोड  प्रकल्प ही लोकचळवळ करण्याच्या दृष्टीने भारतीय जनता पार्टीने या अभियानाच्या माध्यमातून जनजागृती करण्यासोबतच सिंंचन क्षमता वाढविण्यासाठी  या योजनेवर निधी उपलब्ध करून दिला आहे. नदीचे व धरणांचे रुंदीकरण, तसेच स्वच्छता अभियान राबविण्यात यावे. तापी ते बुद्धनेश्वर, पाताळगंगा ते नळगंगा, मेहकर तालुक्यातील महत्वाकांक्षी  प्रकल्प तसेच सिंंदखेड राजा तालुक्यातील आमना धामना नदी प्रकल्पासह प्रकल्प केंद्रीय जलसंपदा विभागाचे मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करून मंजूर करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
राज्यातील नदीजोड प्रकल्पातंर्गत २४ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. महाराष्टÑसाठी नदीजोड  प्रकल्पातंर्गत २४ हजार कोटी  रूपयांची तरतुद केली असल्याचे सांगून नमामि गंगेत बुलढाणा जिल्ह्यात जास्तीत जास्त निधी खेचून आणणार असल्याचे त्यांनी सांगितले. तालुकास्थानी गावपातळीवर सरपंच, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, नगर सेवक यांना या अभियानात मोठ्या प्रमाणात सहभागी करून जलक्रांती निर्माण करावयाची असल्याने सर्वांनी एकत्र येण्ची गरज त्यांनी व्यक्त केली. प्रमुख पाहूणे म्हणून नमामि गंगेचे पश्चिम विदर्भ सहसदस्य शाम देवडे पाटील यांनी नमामि गंगे या अभियानाचे महत्त्व गाव पातळीवर कार्यकर्त्याच्या  मार्फत सांगून लोकचळवळ उभी करण्यासाठी प्रत्येक गावात नमामि गंगेची शाखा गठीत करावी. तसेच प्रत्येक गावात कार्यकारिणीचे फलक लावावे. आपल्या भागातील नद्यांची माहिती संकलीत करून या अभियानात जलसंकटावर मात करण्यासाठी सहभागी व्हावे, तसेच या अभियानाची सविस्तर माहिती कार्यकर्त्यांना त्यांनी दिली.
जिल्हा उपाध्यक्ष डॉ. शिवाजीराव खरात यांनी नमामि गंगेची सविस्तर विस्तृत माहिती दिली. प्रास्ताविकात दत्ता पाटील यांनी जिल्हाभरातील  तापीनदीचे पाणी सवडद बारा पर्यत आणून बुधनेश्वर येथे पैनगंगेच्या उगमात सोडण्याचा प्रकल्प तसेच पलढग धरणातील पाणी पाताळगंगा ते नळगंगा नदीजोड प्रकल्प या संदर्भात माहिती दिली. विस्तारीत बैठकीला नमामि गंगेचे जिल्हा सरचिटणीस अनंत खेकाळे, अर्जूनराव वानखेडे, सखाराम नरोटे, साहेबराव गवते, अ‍ॅड. दशरथसिंह राजपूत, प्रकाश पडोळ, गणेश जवरे, मंगेश सातव, किशोर गवळी, अशोक राजपूत, कृष्णा लकडे, महादेवराव देशमुख, राजेंद्र बोचरे, किशोर जामदार, विकास वानेरे, सुनील शेवाळे, प्रकाश म्हस्के, केशव बाहेकर, विजय मापारी, गणेश तंगडे, गोपाल राजपूत, अमोल बारवाल, राजेश वानखेडे, समाधान वाघ, ओम भुसारे, गोंविद चव्हाण, कुमोदिनी कोलते, सुनीता तिडके, समीर भालेराव, नितीन दासार, रवी पाखरे प्रामुख्याने उपस्थित होते. आभार शहराध्यक्ष गिरीष किन्हीकर यांनी मानले.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.