पाणीपुरवठा योजनेचा घोळ मंत्रालयात

By admin | Published: April 20, 2015 10:39 PM2015-04-20T22:39:20+5:302015-04-20T22:39:20+5:30

योजनेची किंमत वाढूनही योजना अपूर्णच ; नगर विकास राज्यमंत्री यांच्या दालनात गुरुवारी बैठक होणार.

In the ministry of water supply scheme | पाणीपुरवठा योजनेचा घोळ मंत्रालयात

पाणीपुरवठा योजनेचा घोळ मंत्रालयात

Next

खामगाव : शहरासाठी मंजूर असलेल्या ६३ कोटीच्या पाणीपुरवठा योजनेचे काम अर्धवट असून, या कामास अनियमितता झाली आहे. त्यामुळे या कामाची सीबीआय चौकशी व्हावी, तसेच ही योजना पूर्णत्वास जावी, यासाठी नगर विकास राज्यमंत्री ना.डॉ.रणजित पाटील यांच्या दालनात गुरुवारी बैठक होणार आहे, अशी माहिती आ.भाऊसाहेब फुंडकर यांनी या योजनेच्या पाहणीवेळी १९ एप्रिल रोजी दिली. शहराला कायमस्वरुपी पाणीपुरवठा करण्यासाठी ४३ कोटीच्या पाणीपुरवठा योजनेस मान्यता मिळाली; मात्र ६ वर्षे उलटत असतानाही या योजनेचे काम अर्धवट आहे. या कामात अनियमितता दिसत असल्याने या कामाची १९ एप्रिल रोजी आ.भाऊसाहेब फुंडकर, आ.आकाश फुंडकर यांनी मुख्याधिकारी डी.ई.नामवाड तसेच पाणीपुरवठा अभियंता संजय मोकासरे यांना सोबत घेऊन पाहणी केली. केंद्राच्या लहान व मध्यम शहरांसाठी पायाभूत सुविधा योजनेंतर्गत ४३.२८ कोटी रुपये किमतीची पाणीपुरवठा योजना प्रकल्पास २८ मार्च २00८ ला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. ३१ जुलै २00९ रोजी या पाणीपुरवठा योजनेचे काम प्रत्यक्ष सुरु झाले. मुंबई येथील कंत्राटदार पेट्रोन युनिरॉक्स गुणिना जेव्ही या कं पनीला देण्यात आले व कामाचा अवधी दोन वर्षाचा ठरविण्यात आला. या योजनेचे काम कंत्राटदाराने धरणापासून सुरू करायला पाहिजे होते; परंतु तसे न करता शहरात पाईपलाईन टाकण्यात आली व दोन टाक्या बांधण्यात आल्या. हे कामसुद्धा अपूर्ण आहे. तसेच प्रत्यक्ष धरणावर काहीच काम झालेले नाही. त्यासोब तच या पाणीपुरवठा योजनेचे काम २४ महिन्यात पूर्ण न झाल्याने ठेकेदाराने वाढीव खर्च दाखवून ज्यादा दराची मागणी केल्यानुसार सुधारित निकषानुसार हे काम ६३.६५ कोटीच्या घरात गेले आहे. यावेळी आ.अँड.आकाश फुंडकर, भाजप तालुकाध्यक्ष शरद गायकी, शहराध्यक्ष संजय शिनगारे, शेखर पुरोहित, नगरसेवक संजय पुरवार आदींची उपस्थिती होती.

Web Title: In the ministry of water supply scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.