खंडीत वीज पुरवठा जोडणी प्रकरण; मलकापूर नगराध्यक्ष हरिष रावळ यांना अटक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 01:56 PM2018-01-01T13:56:46+5:302018-01-01T13:59:09+5:30

खामगाव : खंडीत केलेला विद्युत पुरवठा खांब्यावर चढुन जोडल्याप्रकरणी नांदुरा पोलिसांनी मलकापूर नगराध्यक्ष अ‍ॅड. हरिष रावळ यांना सोमवारी सकाळी अटक केली.  

Malkapur Municipal President Harish Rawal arrested | खंडीत वीज पुरवठा जोडणी प्रकरण; मलकापूर नगराध्यक्ष हरिष रावळ यांना अटक 

खंडीत वीज पुरवठा जोडणी प्रकरण; मलकापूर नगराध्यक्ष हरिष रावळ यांना अटक 

Next
ठळक मुद्दे१९ सप्टेंबर २०१७ रोजी खांब्यावर चढुन नगराध्यक्ष अ‍ॅड. हरीश रावळ यांनी विद्युत पुरवठा सुरु केला होता. तब्बल ३ महिन्यानंतर नांदुरा पोलिसांनी नगराध्यक्ष अ‍ॅड. हरिष रावळ यांच्यासह तीघांना सोमवारी सकाळी अटक केली.


खामगाव : खंडीत केलेला विद्युत पुरवठा खांब्यावर चढुन जोडल्याप्रकरणी नांदुरा पोलिसांनी मलकापूर नगराध्यक्ष अ‍ॅड. हरिष रावळ यांना सोमवारी सकाळी अटक केली.  
नांदुरा तालुक्यातील तालुक्यातील धानोरा खुर्द, धानोरा बु, वडगांव या गावांचा पाणीपुरवठा महावितरणच्या अधिकाºयांनी सप्टेंबर २०१७ मध्ये खंडीत केला होता. त्यामुळे गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. पिण्याच्या पाण्याची कुठलीही पर्यायी व्यवस्था नसल्याने नागरिकांनी थेट मलकापूर नगराध्यक्ष अ‍ॅड. हरीष रावळ यांच्याशी संपर्क साधला. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असल्याने अ‍ॅड. हरिष रावळ यांनी महावितरणच्या अधिकाºयांशी संपर्क केला मात्र त्यांनी विद्युत पुरवठा जोडण्यास नकार दिला होता. त्यामुळे १९ सप्टेंबर २०१७ रोजी खांब्यावर चढुन नगराध्यक्ष अ‍ॅड. हरीश रावळ यांनी विद्युत पुरवठा सुरु केला होता. त्याची तक्रार २१ सप्टेंबरला नांदुरा पोलिस स्टेशनला पिंपळगाव राजाचे कनिष्ठ अभियंता विनायक बोतरकर यांनी दिली होती. त्यावरुन अप.क्रं. ४५६/१७ कलम १३८ विद्युत कायद्यान्वये नगराध्यक्ष अ‍ॅड. हरिष रावळ यांच्यासह शिवदास वनारे,बंटी उर्फ अमोल पाटील दोघे रा.धानोरा खु.यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. तब्बल ३ महिन्यानंतर नांदुरा पोलिसांनी नगराध्यक्ष अ‍ॅड. हरिष रावळ यांच्यासह तीघांना सोमवारी सकाळी अटक केली.

Web Title: Malkapur Municipal President Harish Rawal arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.