मलकापूर : वयोवृद्ध इसमाचा संशयास्पद मृत्यू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 01:36 AM2018-04-24T01:36:35+5:302018-04-24T01:36:35+5:30

मलकापूर :  येथील कुलमखेल प्रभागात ६५ वर्षीय इसमाचा राहत्या घरासमोर ओट्यावरून पडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी ११ वा. घडली. त्याच्या डोक्याला मार लागल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असली तरी सोमवारी सकाळीच ७ वाजता मृत व त्यांच्या पुतण्यादरम्यान शाब्दीक वाद व पकडापकडी झाल्याने या घटनेत शहरभर वेगवेगळ्या चर्चांना ऊत आला आहे. 

Malkapur: Dangerous death of elderly man! | मलकापूर : वयोवृद्ध इसमाचा संशयास्पद मृत्यू!

मलकापूर : वयोवृद्ध इसमाचा संशयास्पद मृत्यू!

Next
ठळक मुद्देराहत्या घरासमोर ओट्यावरून पडून मृत्यू झाल्याची घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
मलकापूर :  येथील कुलमखेल प्रभागात ६५ वर्षीय इसमाचा राहत्या घरासमोर ओट्यावरून पडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी ११ वा. घडली. त्याच्या डोक्याला मार लागल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असली तरी सोमवारी सकाळीच ७ वाजता मृत व त्यांच्या पुतण्या  शाब्दीक वाद व पकडापकडी झाल्याने या घटनेत शहरभर वेगवेगळ्या चर्चांना ऊत आला आहे. 
यासंदर्भात अधिक माहिती अशी की, कुलमखेल प्रभागातील रहिवासी रमेश हरिभाऊ चोपडे (वय ६५) त्यांच्या राहत्या घरी गावातून दूध आणून बसले असताना अचानक खाली पडले व त्यांच्या नाकाला घसडे बसून व डोक्याला मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. या माहितीस दुजोरा देत शहर पोलिसांनी र्मग १७/१७ कलम १७४ जा.फौ. अन्वये अकस्मात मृत्यूची नोंद केल्याची माहिती दिली. 
मात्र आजच सोमवारी सकाळी ७ वाजता मृत रमेश चोपडे यांचा त्यांच्या पुतण्याशी शाब्दीक वाद होऊन पकडापकडीची घटना घडली होती. त्याविषयी मृताचा मुलगा प्रमोदने भांडणातून त्यांच्या नाकाला मार लागला व खाली पडल्याची माहिती पोलिसांना दिल्याने पोलिसांचा तपास वैद्यकीय अहवालावर येऊन थांबला आहे.
दरम्यान, याप्रकरणी तपास अधिकारी तथा सहायक पोलीस निरीक्षक आशिष लवंगळे यांच्याशी संवाद साधला असता, त्यांनी घटनेचा पंचनामा करून तपास सुरू आहे, असे सांगितले; मात्र काका-पुतण्यात वाद झाल्याने या घटनेविषयी वेगवेगळ्या चर्चांना ऊत आला आहे. शहरात यानिमित्ताने वेगवेगळ्या शंका-कुशंका व्यक्त होत आहेत.

Web Title: Malkapur: Dangerous death of elderly man!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.