लोणार : ‘मानव विकास’च्या १५ लाखांच्या निधीचे नियमबाह्य़ वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2018 12:58 AM2018-01-26T00:58:10+5:302018-01-26T00:59:45+5:30

लोणार : कार्यालयीन आस्थापनाविषयक बाबी सांभाळणे हे कनिष्ठ सहाय्यकाचे कर्तव्य असतानाही मानव विकास कार्यक्रमातंर्गत २0१३ ते २0१५ मधील प्राप्त १५ लाख रुपयांच्या निधीचे रोख पुस्तक अनधिकृतपणे ताब्यात ठेऊन लाभार्थ्यांना त्याचे धनादेश वितरीत केल्याप्रकरणी रायगाव  प्राथमिक आरोग्य केंद्र येथील पूर्वाश्रमीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बी. आर. राठोड यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार यांनी ही नोटीस बजावली आहे.

Lonar: Ruleless distribution of fund of Rs.15 lakh of 'Human Development' fund | लोणार : ‘मानव विकास’च्या १५ लाखांच्या निधीचे नियमबाह्य़ वितरण

लोणार : ‘मानव विकास’च्या १५ लाखांच्या निधीचे नियमबाह्य़ वितरण

Next
ठळक मुद्देवैद्यकीय अधिकार्‍याला कारणे दाखवा नोटीस

लोकमत न्यूज नेटवर्क
लोणार : कार्यालयीन आस्थापनाविषयक बाबी सांभाळणे हे कनिष्ठ सहाय्यकाचे कर्तव्य असतानाही मानव विकास कार्यक्रमातंर्गत २0१३ ते २0१५ मधील प्राप्त १५ लाख रुपयांच्या निधीचे रोख पुस्तक अनधिकृतपणे ताब्यात ठेऊन लाभार्थ्यांना त्याचे धनादेश वितरीत केल्याप्रकरणी रायगाव  प्राथमिक आरोग्य केंद्र येथील पूर्वाश्रमीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बी. आर. राठोड यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार यांनी ही नोटीस बजावली आहे.
लोणार तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये डॉ. बी. आर. राठोड  २0१३ ते २0१५ या कालावधीत वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्या कालावधीत या निधी वाटपात अनियमितता झाल्याची तक्रार जिल्हा परिषद सदस्या गोदावरी भगवान कोकाटे यांनी नऊ जानेवारी २0१८ रोजी केली होती. त्यावेळी २0१३-१४ या कालावधीसाठी जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाने मानव विकास कार्यक्रमाकरीता पाच लाख २३ हजार ५00 रुपये आणि २0१४-१५ मध्ये दहा लाख ४९ हजार असे १५ लाख ७२ हजार रुपये अनुदान रायगाव प्राथमिक आरोग्य केंदासाठी वितरीत केले होते. त्यासंदर्भाने रोख पुस्तक तपासण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार व सहाय्यक लेखा अधिकारी हे गेले असता उपरोक्त कालावधीचे रोख पुस्तकच आरोग्य केंद्रात ठेवण्यात आले नव्हते. सोबतच खर्चाची प्रमाणके सुद्धा तपासणीसाठी उपल्बध करून देण्यात आली नव्हती. त्याबाबत डॉ. राठोड यांनी दोन दिवसात ते उपलब्ध करून देण्याची हमी दिली होती. परंतू ती उपल्बध करून दिली नाही. त्यामुळे डॉ. राठोड यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. वेळेत ती उपलब्ध करून दिली नाही तर संबंधीत रक्कम ही डॉ. राठोड याच्याकडून वसूल करण्याची कारवाई प्रस्तावीत करण्यात येईल, असे जिल्हा आरोग्य अधिकार्यांनी कारणे दाखवा नोटीसमध्ये स्पष्ट केले आहे.

Web Title: Lonar: Ruleless distribution of fund of Rs.15 lakh of 'Human Development' fund

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.