#खामगाव कृषी महोत्सव: शेती उत्पादन वाढीसाठी ‘बायोडायनॅमिक’ वरदान! - संजय रोमण  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 05:47 PM2018-02-17T17:47:32+5:302018-02-17T17:49:40+5:30

खामगाव : शेतीतील उत्पादन वाढीसाठी ‘बायोडायनॅमिक’ पद्धत एक वरदान ठरत असल्याचे प्रतिपादन सर्ग विकास समिती अकोलाचे संजय रोमण यांनी केले.

# Khamgaon Krishi Mahotsav: 'Biodonamic' boon for agricultural growth! - Sanjay Roman | #खामगाव कृषी महोत्सव: शेती उत्पादन वाढीसाठी ‘बायोडायनॅमिक’ वरदान! - संजय रोमण  

#खामगाव कृषी महोत्सव: शेती उत्पादन वाढीसाठी ‘बायोडायनॅमिक’ वरदान! - संजय रोमण  

googlenewsNext
ठळक मुद्देते खामगाव येथील कृषि महोत्सवामध्ये शनिवारला शास्त्रज्ञ व प्रगतशिल शेतकºयांच्या मार्गदर्शन सत्रात ‘सेंद्रीय शेती’ या विषयावर बोलत होते. केमीकलच्या वापरामुळे जमीनीचे आरोग्य धोक्यात येत आहे. पाला, १० लिटर गोमूत्र, पाच किलो शेण व उर्जा नावाची औषधी एकत्र करून किटकनाशक बनावता येते.

- ब्रम्हानंद जाधव

खामगाव : शेतीसाठी बायोडायनॅमिक तंत्रज्ञान पद्धतीचा वापर अत्यंत महत्वाचा आहे. या पद्धतीमध्ये कमी खर्चात जमीन सुधारणेवर भर दिल्या जात असून १० देशात या पद्धतीचा अवलंब होत आहे. शेतीतील उत्पादन वाढीसाठी ‘बायोडायनॅमिक’ पद्धत एक वरदान ठरत असल्याचे प्रतिपादन सर्ग विकास समिती अकोलाचे संजय रोमण यांनी केले. ते खामगाव येथील कृषि महोत्सवामध्ये शनिवारला शास्त्रज्ञ व प्रगतशिल शेतकºयांच्या मार्गदर्शन सत्रात ‘सेंद्रीय शेती’ या विषयावर बोलत होते. पुढे बोलताना संजय रोमण म्हणाले की, शेतीतील उत्पादन वाढविण्यासाठी शेतकरी विविध केमीकलचा वापर करत आहेत. त्यामुळे दोन क्विंटल उत्पादनाच्या जागेवर १० क्ंिवटल उत्पादन शेतकºयांना मिळत आहे. परंतू शेतकºयांचा फायदा पाहिजे तेवढा होत नाही. केमीकलच्या वापरामुळे जमीनीचे आरोग्य धोक्यात येत आहे. त्यामुळे जमीनीचे आरोग्य सुधारण्यासाठी बायोडायनॅमिक या पद्धतीचा वापर करण्यावर सर्ग विकास समिती, अकोला कडून भर देण्यात येत आहे. पिकांवर किडीचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शेतकºयांना अत्यंत महागडे किटकनाशक फवारावे लागते. परंतू हेच किटकनाशक शेतकºयांनी घरी तयार केले तर त्यांना अधिक फायदा होऊ शकतो. वेगवेगळ्या झाडांच्या पाल्यापासून घरी किटकनाशक तयार केले जावू शकते. त्यासाठी पाला, १० लिटर गोमूत्र, पाच किलो शेण व उर्जा नावाची औषधी एकत्र करून किटकनाशक बनावता येते. यामूळे नायट्रोजनही मिळते. यात रुईचा पाला मिसळल्यास झिंक, बोरान हे घटक मिळतील. परिणामस्वरूप पिकांवर बुरशी रोग पडू शकत नाही. हे किटकनाशक ५०० रुपयात तयार होत असून एका एकरात सहा ते सात वेळा फवारणी करता येते. त्यामुळे या पद्धतीचा अवलंब करून शेतकºयांनी उत्पादन वाढवावे, असे आवाहन संजय रोमण यांनी केले. यावेळी कृषि विभागाचे अधिकारी, कर्मचारी व शेतकºयांची उपस्थिती होती.

बायोडायनॅमिक शेती पंचागचा वापर

शेती कामासाठी शेतीचे पंचाग पेरणीसह शेतीची विविध कामे करण्यासाठी बायोडायनॅमिक शेती पंचागचा वापर केल्यास उत्पादनात वाढ होण्याची शश्वाती अधिक असते. भाजीपाला पिकासाठी याचा वापर केल्यास १५ ते १८ टक्के उत्पादनात वाढ होते. बायोडायनॅमिक शेती पंचागात पेरणी केंव्हा करावी व कोणत्या दिवशी पेरणी टाळावी, याची माहिती दिलेली असून, या पंचागचा वापर अनेक शेतकरी करत असल्याची माहिती संजय रोमण यांनी दिली.

Web Title: # Khamgaon Krishi Mahotsav: 'Biodonamic' boon for agricultural growth! - Sanjay Roman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.