कोरेगाव भीमा प्रकरण ‘आरएसएस’चे षड्यंत्र - कवाडे यांचा आरोप 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 12:27 AM2018-01-16T00:27:15+5:302018-01-16T00:29:49+5:30

सिंदखेडराजा : महाराष्ट्रात जाती जातीत दंगली भडकवून राजकीय सत्ता हस्तगत करायची आणि शेतकरी आत्महत्या, मराठा आरक्षण, धनगर आरक्षण याला बगल देऊन भीमा कोरेगावसारख्या दंगली भडकवून समाजा-समाजात अराजकता निर्माण करायची, हा ब्राम्हणी कावा असून, हे आरएसएसचे षड्यंत्र आहे, असा आरोप रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.जोगेंद्र कवाडे यांनी नामांतर स्मृती सोहळय़ानिमित्त आज राहेरी बु. येथे केला.

Karegaon Bhima Case 'RSS' conspiracy - Kawade allegations | कोरेगाव भीमा प्रकरण ‘आरएसएस’चे षड्यंत्र - कवाडे यांचा आरोप 

कोरेगाव भीमा प्रकरण ‘आरएसएस’चे षड्यंत्र - कवाडे यांचा आरोप 

Next
ठळक मुद्देराहेरी बु. येथे पार पडला नामांतर स्मृती सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्क
सिंदखेडराजा : महाराष्ट्रात जाती जातीत दंगली भडकवून राजकीय सत्ता हस्तगत करायची आणि शेतकरी आत्महत्या, मराठा आरक्षण, धनगर आरक्षण याला बगल देऊन कोरेगाव भीमासारख्या दंगली भडकवून समाजा-समाजात अराजकता निर्माण करायची, हा ब्राम्हणी कावा असून, हे आरएसएसचे षड्यंत्र आहे, असा आरोप रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.जोगेंद्र कवाडे यांनी नामांतर स्मृती सोहळय़ानिमित्त आज राहेरी बु. येथे केला.
या नामांतर स्मृती सोहळय़ाला माजी मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा आ.राहुल बोंद्रे, रिपाइं युवा नेते जयदीप कवाडे, चरणदास इंगोले, गोपाल आटोटे, सभापती राजू ठोके, राजाभाऊ सावळे, मनोज कायंदे, रजनी कवाडे, विजय गवई, सचिन शिंगणे, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शिवदास रिंढे, सागर कुळकर्णी, प्रतिभा कवाडे यांसह रिपाइंचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रा.कवाडे म्हणाले की, आजचे सरकार हे भाजप-सेनेचे नसून सर्व निर्णय आरएसएस घेत आहे. हे लोक संविधान बदलण्याची भाषा बोलतात. ज्यांना संविधान कळालेच नाही, तेच लोक ही भाषा बोलतात. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला संविधान सादर करताना लोकशाही दिली. कितीही o्रीमंत व्यक्ती असला तरी त्यालाही एकाच मताचा अधिकार दिला. या भारत देशात अनेक जाती, धर्माचे लोक राहतात, त्यांना तोडण्याचे काम विदेशी शक्तीने अनेक वेळा केले; परंतु संविधानामुळे हा भारतदेश एकसंघ राहिला. त्यामुळे संविधान बदलने म्हणजे बायका बदलण्याचा खेळ नव्हे, असेही उद्गार त्यांनी काढले. कोरेगाव   भीमा प्रकरणात दलित समाजावर दरोड्यासारखे, ३0७ सारखे गुन्हे दाखल करून कोम्बिंग ऑपरेशन करीत अटकसत्र सुरु केले आहे, हे त्वरित थांबवा, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मी केली. त्यांनी शब्द दिला ते पाळतील, अन्यथा २६ फेब्रुवारीला हिवाळे अधिवेशन सुरु होत आहे. त्यानंतर जेलभरो आंदोलनही रिपाइं जनता करेल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
प्रारंभी माजी मंत्री राजेंद्र शिंगणे म्हणाले की, मराठवाडा विद्यापीठाचे १९९४ साली तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असे नामांतर करून डॉ.बाबासाहेब आंबेडकर अनुयायांना दिलासा दिल्याचे सांगितले, तर कोरेगाव भीमाची दंगल ही पूर्वनियोजित होती, हे माझ्या मित्राकडून कळाले. 
२00 वर्षात कोरेगाव भीमा येथे जी घटना घडली नाही, ती आता कशी! असा प्रश्नदेखील उपस्थित होत असल्याचे त्यांनी सांगितले. तर रिपाइंचे युवा नेते जयदीप कवाडे म्हणाले की, दंगलखोर संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांना तत्काळ अटक करा, आमचे काही नेते कटोरा हातात घेऊन त्यांची लाचारी पत्करतात, ही लाचारी रिपब्लिकन जनता सहन करणार नाही, असे म्हणाले.

Web Title: Karegaon Bhima Case 'RSS' conspiracy - Kawade allegations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.