जळगाव जामोद : वीज कार्यालयावर धडकला संतप्त शेतक-यांचा मोर्चा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2018 12:55 AM2018-03-06T00:55:33+5:302018-03-06T00:55:33+5:30

जळगाव जामोद : आधीच न झालेली कर्जमाफी, बोंडअळी व दुष्काळी परिस्थितीमुळे हैराण असलेल्या शेतकºयांच्या कृषी पंपांचा वीज पुरवठा वीज वितरण कंपनीने कुठलीही सूचना न देता तोडला. हा सर्व प्रकार वसुलीपोटी केला. त्यामुळे शेतकरी चांगलेच संतप्त झाले आणि ५ मार्च रोजी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रमेशचंद्र घोलप यांच्या नेतृत्वात जळगाव वीज कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.

Jalgaon Jamod: On the power office, the agitated farmers protest! | जळगाव जामोद : वीज कार्यालयावर धडकला संतप्त शेतक-यांचा मोर्चा!

जळगाव जामोद : वीज कार्यालयावर धडकला संतप्त शेतक-यांचा मोर्चा!

googlenewsNext
ठळक मुद्देवसुलीपोटी कृषी पंपांचा वीज पुरवठा तोडला

लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव जामोद : आधीच न झालेली कर्जमाफी, बोंडअळी व दुष्काळी परिस्थितीमुळे हैराण असलेल्या शेतक-यांच्या कृषी पंपांचा वीज पुरवठा वीज वितरण कंपनीने कुठलीही सूचना न देता तोडला. हा सर्व प्रकार वसुलीपोटी केला. त्यामुळे शेतकरी चांगलेच संतप्त झाले आणि ५ मार्च रोजी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रमेशचंद्र घोलप यांच्या नेतृत्वात जळगाव जामोद वीज कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.
यावेळी शेकडो शेतकरी या मोर्चात सामील झाले होते. घोलप यांनी कार्यकारी अभियंता पवार आणि उपकार्यकारी अभियंता कठाळे यांना जाब विचारला व चांगलेच धारेवर धरले. उमापूर शिवारातील जवळपास २५० कृषी पंपांचा वीज पुरवठा बंद झाल्याने रब्बी पिकांना पाण्याचा गंभीर प्रश्न शेतकºयांसमोर निर्माण झाला होता. त्यामुळे सदर शेतकºयांनी हा प्रकार घोलप यांना सांगितला. त्यामुळे २५० शेतकºयांचा ताफा धडकताच वीज वितरणचे अधिकारी यांना चर्चेनंतर कर्मचाºयांना वीज पुरवठा सुरळीत करण्याचे आदेश दिले. त्यामुळे प्रकार निवळला. यावेळी राजू पाटील, युनूस खान, नगरसेवक रमेश ताडे यांच्यासह शेतकरी समाधान नानकदे, प्रल्हाद केदार, संतोष डोबे, रामदास कोथळकार, पांडुरंग ढगे, राजू रौंदळे, चंद्रभान राऊत, गजानन भुते, गोपाल कोथळकार, गजानन ढगे, तुळशिराम नानकदे, कैलास ढगे, सुनील काळपांडे, समाधान डोबे आदींची उपस्थिती होती. वरिष्ठांकडून आदेश नसताना वीज पुरवठा तोडून शेतकºयांना अडचणीत आणले होते; परंतु अधिकाºयांनी चूक कबूल करून दिलगिरी व्यक्त केली व वीज पुरवठा सुरळीत केला. त्यामुळे शेतकरी वर्ग शांत झाला, असे काँग्रेसचे नेते घोलप यांनी बोलताना सांगितले. 

Web Title: Jalgaon Jamod: On the power office, the agitated farmers protest!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.