अवैध देशी दारूची वाहतूक करणार्‍या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 11:51 PM2017-09-18T23:51:10+5:302017-09-18T23:51:20+5:30

अमडापूर : चिखली तालुक्यातील अमडापूर पो.स्टे.हद्दीतील उंद्री शिवारामध्ये  कार व दोन मोटारसायकलने अवैध देशी दारूची वाहतूक करणार्‍या पाच जणांविरुद्ध अमडापूर पोलिसांनी १८ सप्टेंबर रोजी कार्यवाही केली.  यामध्ये ४१ हजार ३२0 रुपयांची देशी दारू व तीन मोबाइल व वाहनांसह एकूण दोन लाख ४१ हजार रुपयांचा माल जप्त केला.

Inquiries against five persons who have been trafficked for illegal liquor trade | अवैध देशी दारूची वाहतूक करणार्‍या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

अवैध देशी दारूची वाहतूक करणार्‍या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Next
ठळक मुद्देउंद्री शिवारातील घटना दोन लाख ५0 हजारांचा माल जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क
अमडापूर : चिखली तालुक्यातील अमडापूर पो.स्टे.हद्दीतील उंद्री शिवारामध्ये  कार व दोन मोटारसायकलने अवैध देशी दारूची वाहतूक करणार्‍या पाच जणांविरुद्ध अमडापूर पोलिसांनी १८ सप्टेंबर रोजी कार्यवाही केली.  यामध्ये ४१ हजार ३२0 रुपयांची देशी दारू व तीन मोबाइल व वाहनांसह एकूण दोन लाख ४१ हजार रुपयांचा माल जप्त केला.
अमडापूर पो.स्टे.ला नव्याने रूजू झालेले विक्रम पाटील यांनी पो.स्टे.चा पदभार स्वीकारताच अवैध धंदेवाल्यावर कार्यवाहीचा बडगा उगारला आहे.  १८ सप्टेंबर रोजी उंद्री शिवारात अवैध देशी दारू वाहतूक होत असल्याची माहिती अमडापूर ठाणेदार विक्रम पाटील यांना मिळाली. त्यावरून रात्री १.३0 वाजेला एएसआय शेख युनूस, पोना संजय नागवे, सुनील चौधरी, विजय बेडवाल, हरिभाऊ चव्हाण, शे.मुसा व चालक नीलेश वाकडे यांनी ठाणेदार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उंद्री शिवारामध्ये अवैध देशी दारू वाहतूक करणार्‍यांवर पाळत ठेवून आरोपी गणेश चिंचोले, दयाराम चिंचोले, बालचंद चिंचोले, सचिन चिंचोले सर्व रा.उंद्री यांना पकडून त्यांचे ताब्यातून अवैध देशी दारूची वाहतूक करणारी कार एम.एच.३0 डी १६३८ व दोन मोटारसायकल एमएच २८ एएल ९२९१, एमएच २८ डब्ल्यू ३१२0 या दोन मोटारसायकली किंमत ७५ हजार रू. व मारोती कार किंमत एक लाख वीस हजार या वाहनावर १६ बॉक्स देशी दारू शिशा किंमत ४१ हजार ३२0 व तीन मोबाइल असा एकूण दोन लाख ४१ हजार रुपयांचा माल जप्त केला.  आरोपी गणेश चिंचोले, दयाराम चिंचोले, बालचंद चिंचोले, सचिन चिंचोले यांना अटक केली, तर यातील मारोती कारचालक शेख रशिद ऊर्फ रईस रा.उंद्री हा फरार होण्यात यशस्वी झाला. सदर आरोपी विरुद्ध अप.२२९/0१७ कलम ६५ (ड) अ (ई) दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

अवैध व्यवसायिकांनी त्यांचे अवैध धंदे बंद करून सनदशिर मार्गाने स्वत: चा उदरनिर्वाह करावा, अन्यथा त्यांच्याविरूद्ध कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल. जप्त केलेली अवैध देशी दारू कुणाच्या दुकानातून आणण्यात आली, याचा शोध सुरू आहे. 
- विक्रम पाटील, ठाणेदार अमडापूर

Web Title: Inquiries against five persons who have been trafficked for illegal liquor trade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.