सर्व शेती कर्जांची माहिती न दिल्यास अर्ज होणार अपात्र! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 12:51 AM2017-09-21T00:51:33+5:302017-09-21T00:52:41+5:30

बुलडाणा :  छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनें तर्गत कर्जमाफी अर्जामध्ये सर्व बँकांकडील शेती कर्जांची  माहिती देणे आवश्यक आहे. ज्या शेतकर्‍यांनी विविध  बँकांचे शेती कर्ज काढलेले आहे, त्यांनी सर्व बँक कर्ज खा त्यांची माहिती अर्जात भरणे अत्यावश्यक आहे. यामध्ये  जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेचाही समावेश आहे. माहिती न  भरल्यास अर्ज कर्जमाफीसाठी अपात्र ठरणार आहे.

Ineligible to apply if all farm loan information is not available! | सर्व शेती कर्जांची माहिती न दिल्यास अर्ज होणार अपात्र! 

सर्व शेती कर्जांची माहिती न दिल्यास अर्ज होणार अपात्र! 

Next
ठळक मुद्देकर्जमाफी अर्जामध्ये शेतकर्‍यांनी सर्व बँकांकडील कर्जाची  माहिती देणे अनिवार्यजिल्हा बँकेच्या कर्जाची नोंद करणे आवश्यक 

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा :  छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनें तर्गत कर्जमाफी अर्जामध्ये सर्व बँकांकडील शेती कर्जांची  माहिती देणे आवश्यक आहे. ज्या शेतकर्‍यांनी विविध  बँकांचे शेती कर्ज काढलेले आहे, त्यांनी सर्व बँक कर्ज खा त्यांची माहिती अर्जात भरणे अत्यावश्यक आहे. यामध्ये  जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेचाही समावेश आहे. माहिती न  भरल्यास अर्ज कर्जमाफीसाठी अपात्र ठरणार आहे.
 सर्व बँकांच्या कर्जाची नोंद करण्याकरिता शेतकर्‍यांना  नव्याने अर्ज भरण्याची गरज नसून, त्याच अर्जामध्ये एडीट  ऑप्शनद्वारे ही माहिती भरावी लागणार आहे. अर्ज सादर  करताना सर्व थकीत खातेदारांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी  बँक, राष्ट्रीयीकृत बँक, खासगी बँक व ग्रामीण बँक अशा  सर्व प्रकारच्या वित्तीय संस्थांकडून घेतलेल्या सर्व प्रकारच्या  कर्जाची माहिती सादर केलेली नसल्यास ती सादर करावी  लागणार आहे. घेतलेल्या सर्व कर्जाची माहिती सादर केलेली  नाही, असे आढळल्यास अशा खातेदारांवर नियमानुसार  कारवाई करण्यात येणार आहे. अर्ज सादर करताना सर्व  बँकांकडून घेतलेल्या संपूर्ण कर्जाची माहिती सादर करणे  अनिवार्य आहे. सदर माहिती सादर न केल्यास व अर्जदाराचा  अर्ज कर्जमाफीसाठी अपात्र राहिल्यास त्याला अर्जदार  जबाबदार राहणार आहे. ज्या शेतकर्‍यांनी अशी माहिती  सादर केली नाही, त्यांनी ती त्वरित ऑनलाइन एडीट ऑ प्शनमधून सादर करावी, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक  नानासाहेब चव्हाण यांनी केले आहे.

जिल्हा बँकेच्या कर्जाची नोंद करणे आवश्यक 
शेतकर्‍यांनी दोन ते तीन बँकांकडून कर्ज घेतले आहे.  कर्जमाफीच्या अर्जात ज्या बँकेचे कर्ज जास्त आहे, त्याची  नोंद केली आहे; मात्र शेतकर्‍यांनी दिलेले अर्ज सर्व बँकेकडे  जाणार असून, एखाद्या बँकेतील कर्जाची नोंद नसली तर  अर्ज रद्द करण्यात येणार आहे. शेतकर्‍यांनी जिल्हा बँकेव्य ितरिक्त इतर बँकांकडून कर्ज घेतले असले, तरी त्यांना १.५0  लाखापर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे जास् तीत जास्त कर्जमाफीचा लाभ मिळविण्यासाठी जिल्हा बँक  आणि इतर बँकेकडे आधार कार्ड, के.वाय.सी.कागदपत्रे  द्यावीत, शेतकर्‍यांनी एकापेक्षा जास्त बँकांकडून कर्ज घे तलेली असतील व एकाच बँकेच्या कर्जाचा ऑनलाइन  अर्जामध्ये उल्लेख केला असेल, अशा शेतकर्‍यांनी त्यांच्या  अर्जामध्ये दुरुस्ती करून जिल्हा बँकेसह सर्वच बँकांच्या  कर्जाची व बचत खात्याची माहिती सुविधा केंद्रावर जाऊन  ऑनलाइन अर्जामध्ये अपडेट करुन घेणे आवश्यक आहे. 

आधार कार्ड बँकेत देणे आवश्यक  
शेतकर्‍यांनी बँकेमध्ये कर्जखात्याला आधार कार्ड लिंक  करणे आवश्यक आहे. आधार कार्ड लिंक केले नाही तर  वंचित राहावे लागणार आहे. 
-

Web Title: Ineligible to apply if all farm loan information is not available!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.