रोहयो विहिरींच्या कामात गैरप्रकार; आणखी चार शेतक-यांचे उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 01:49 AM2018-04-11T01:49:59+5:302018-04-11T01:49:59+5:30

मोताळा(बुलडाणा) : तालुक्यातील आडविहीर येथे रोहयो अंतर्गत सुरू असलेल्या विहिरीच्या कामात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी आडविहीर येथील दोन शेतकºयांनी ६ एप्रिलपासून शेतात उपोषण सुरू केले होते. दरम्यान, उपोषणाच्या पाचव्या दिवशी मंगळवारी आणखी चार शेतकरी या उपोषणात सहभागी झाले आहेत. त्यामुळे उपोषणाची व्याप्ती वाढली आहे. शेतकºयांनी चक्क शेतातील विहिरीसमोरच हे उपोषण सुरू केलेले आहे.

Illegal work in Roho wells; Four more farmers' fasting | रोहयो विहिरींच्या कामात गैरप्रकार; आणखी चार शेतक-यांचे उपोषण

रोहयो विहिरींच्या कामात गैरप्रकार; आणखी चार शेतक-यांचे उपोषण

Next
ठळक मुद्दे काम अर्धवट अवस्थेत

मोताळा(बुलडाणा) : तालुक्यातील आडविहीर येथे रोहयो अंतर्गत सुरू असलेल्या विहिरीच्या कामात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी आडविहीर येथील दोन शेतक-यांनी ६ एप्रिलपासून शेतात उपोषण सुरू केले होते. दरम्यान, उपोषणाच्या पाचव्या दिवशी मंगळवारी आणखी चार शेतकरी या उपोषणात सहभागी झाले आहेत. त्यामुळे उपोषणाची व्याप्ती वाढली आहे. शेतकºयांनी चक्क शेतातील विहिरीसमोरच हे उपोषण सुरू केलेले आहे.
      आडविहीर येथील शेतकरी राजेंद्र भागवत पाटील यांच्या शेतात रोहयो अंतर्गत विहिरीचे काम सुरू होते. संबंधित अधिका-यांनी गैरकारभार करून संपूर्ण कामाची देयके काढली; मात्र काम पूर्ण केले नाही. कागदोपत्री विहीर पूर्ण दाखवून देयके काढण्यात आल्याचा आरोप शेतकºयांनी केला.  कमलबाई बारसू नारखेडे यांच्या शेततळ््याबाबतीतही असाच प्रकार घडला आहे. ५० फूट कामाच्या विहिरीचे फक्त २५ खोदकाम करून काम अर्धवट अवस्थेत आहे. रोहयोच्या कामात असाच भ्रष्टाचार सुरू असल्याचे समजते. राजेंद्र भागवत पाटील व नीलेश बारसू नारखेडे या दोघा शेतकºयांचा उपोषणाचा मंगळवारी पाचवा दिवस होता. दरम्यान, अनेक मान्यवरांनी उपोषणाला भेटी दिल्या; मात्र प्रशासनाकडून न्याय न मिळाल्याने उपोषण सुरूच आहे. मंगळवारी माजी सभापती शरदचंद्र पाटील, माजी सरपंच श्रीकृष्ण नारखेडे, सामाजिक कार्यकर्ते गजानन खाचणे, मनोहर  नारखेडे यांनी सदर उपोषणाला पाठिंबा जाहीर करून उपोषणात सहभागी झाले. त्यामुळे आता एकूण सहा जण उपोषण करीत आहेत. मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण सुरू ठेवणार असल्याची भूमिका उपोषणकर्त्यांनी घेतली. 
 

Web Title: Illegal work in Roho wells; Four more farmers' fasting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.