ग्रामीण पाणी पुरवठय़ाची वीज खंडित केल्यास आंदोलन  छेडू! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 12:31 AM2017-09-21T00:31:00+5:302017-09-21T00:31:47+5:30

सणासुदीचे व शेती कामाचे दिवस पाहता नागरिकांची गैरसोय  तत्काळ थांबविण्यात यावी व कोणत्याही ग्रामीण पाणी पुरवठा योजनेची वीज खंडित करण्यात येऊ नये, अन्यथा  शासनाविरोधात कॉंग्रेस पक्षाकडून तीव्र आंदोलन छेडण्यात  येईल, असा इशारा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार राहुल बोंद्रे  यांनी  मुख्यमंत्री व ऊर्जामंत्री यांना पाठविलेल्या निवेदनाद्वारे  दिला आहे.

If the power of the rural water supply breaks, the agitation will start! | ग्रामीण पाणी पुरवठय़ाची वीज खंडित केल्यास आंदोलन  छेडू! 

ग्रामीण पाणी पुरवठय़ाची वीज खंडित केल्यास आंदोलन  छेडू! 

googlenewsNext
ठळक मुद्देआमदार राहुल बोंद्रे यांचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्क
चिखली : ग्रामीण भागातील पाणी पुरवठा योजनांचा विद्युत  पुरवठा खंडित करण्याचा प्रकार विद्युत विभागाने सुरू केला  आहे. त्यामुळे अनेक गावांतील पाणीपुरवठा योजना  कोलमडून पडल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी  भटकंती करण्याची वेळ येवून ठेपली आहे; तसेच  सणासुदीचे व शेती कामाचे दिवस पाहता नागरिकांची गैरसोय  तत्काळ थांबविण्यात यावी व कोणत्याही ग्रामीण पाणी पुरवठा योजनेची वीज खंडित करण्यात येऊ नये, अन्यथा  शासनाविरोधात कॉंग्रेस पक्षाकडून तीव्र आंदोलन छेडण्यात  येईल, असा इशारा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार राहुल बोंद्रे  यांनी  मुख्यमंत्री व ऊर्जामंत्री यांना पाठविलेल्या निवेदनाद्वारे  दिला आहे.
राज्यात मागणीपेक्षा विद्युत निर्मिती जास्त असताना तथाक थीत कोळसा पुरवठय़ाचे कारण समोर करीत विद्युत वितरण  कंपनीने आचानकपणे सणासुदीच्या दिवसातील  न्1ागरिकांची विजेची गरज लक्षात न घेता, मोठय़ा प्रमाणावर  भारनियमन लादण्याचा प्रकार सुरू केला आहे. वस्तुत:  सणासुदीच्या दिवसात, उत्सवाचे काळात ग्रामीण तसेच  अर्धशहरी नागरिकांची विजेची मागणी वाढलेली असते. 
त्याशिवाय येणारा रब्बी हंगाम पाहता शेतकर्‍यांनाही अखंडि त विद्युत पुरवठय़ाची गरज आहे. असे असताना विद्युत वि तरण कंपनी भारनियमन करून जनतेला त्रास देण्याचा प्रकार  करीत आहे.  
तो तत्काळ बंद व्हावा, याचबरोबर ग्रामीण पाणीपुरवठा  योजनांची कुठलीही पूर्वसूचना न देता तोडल्या जाणारी वीज  हा प्रकार थांबवून जनतेची पिण्याच्या पाण्याची गैरसोय करू  नये, अशी आग्रही मागणी आमदार राहुल बोंद्रे यांनी मु ख्यमंत्री व उर्जामंत्री यांना पाठविलेल्या या निवेदनाद्वारे केली  आहे. 

Web Title: If the power of the rural water supply breaks, the agitation will start!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.