शेतकर्‍यांना १५ दिवसांत नुकसानभरपाई न मिळाल्यास मंत्र्यांना गावबंदी - तुपकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2018 12:30 AM2018-02-08T00:30:32+5:302018-02-08T00:33:12+5:30

चिखली : विदर्भ, मराठवाड्यातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांची दयनीय अवस्था झाली आहे. सरकारने बोंडअळी व सोयाबीनच्या नुकसान भरपाईवर केवळ राजकारण करीत आहे; मात्न आता शेतकर्‍यांचा अंत पाहू नका. येत्या १५ दिवसात कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांना नुकसान भरपाई न दिल्यास मंत्र्यांना गावबंदी करू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते तथा वस्त्नोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी दिला.

If the farmers are not compensated for compensation within 15 days, the ministers will be censored | शेतकर्‍यांना १५ दिवसांत नुकसानभरपाई न मिळाल्यास मंत्र्यांना गावबंदी - तुपकर

शेतकर्‍यांना १५ दिवसांत नुकसानभरपाई न मिळाल्यास मंत्र्यांना गावबंदी - तुपकर

Next
ठळक मुद्देगोद्री येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शाखेचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्क
चिखली : विदर्भ, मराठवाड्यातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांची दयनीय अवस्था झाली आहे. सरकारने बोंडअळी व सोयाबीनच्या नुकसान भरपाईवर केवळ राजकारण करीत आहे; मात्न आता शेतकर्‍यांचा अंत पाहू नका. येत्या १५ दिवसात कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांना नुकसान भरपाई न दिल्यास मंत्र्यांना गावबंदी करू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते तथा वस्त्नोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी दिला.
चिखली तालुक्यातील गोदरी येथे काल ६ फेब्रुवारी रोजी झालेल्या सभेत ते बोलत होते, यावेळी रविकांत तुपकर यांच्या हस्ते गोदरी येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नाम फलकाचे उद्घाटन झाले. प्रारंभी रविकांत तुपकर यांचे गोदरी गावात आगमन होताच ढोल ताशाच्या गजरात व फटाक्यांच्या आतषबाजीत गावकर्‍यांनी जल्लोषात स्वागत केले. यावेळी रविकांत तुपकर म्हणाले की, शासनाने सुरुवातीला सोयाबीनचे भाव पाडल्याने शेतकर्‍यांना मातीमोल भावाने आपले सोयाबीन विकावे लागले. दुसरीकडे मराठवाडा व विदर्भातील कपाशीवर बोंडअळी पडल्यामुळे शेतकर्‍यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले, सरकारने या कापूस उत्पादक शेतकर्‍यांना नुकसान भरपाई देण्याचे कबूल केले. 
मात्न हे सरकार जोपर्यंत शेतकर्‍यांच्या खात्यात पैसे टाकत नाही, तोपर्यंत ‘‘सरकारचे हे लबाडाचे आवतन’’ असल्याचे त्यांनी स्पष्ट केले, तसेच नाफेड योजना शेतकर्‍यांसाठी नसून भाजपच्या दलालांसाठी असल्याचा आरोप त्यांनी केला. केंद्र सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पात शेतीमालाला हमीभाव व उत्पादन खर्चावर दीडपट भाव देण्याची घोषणा केली; मात्न सरकारने आधी दीडपट हमी भाव व उत्पादन खर्चाची व्याख्या स्पष्ट करावी, अशी आमची मागणी असल्याचे ते म्हणाले; तसेच गोदरी येथील गावकर्‍यांनी माझ्यावर व माझ्या चळवळीवर नेहमीच भरभरून प्रेम केले आहे.     यावेळी मराठवाडा कार्याध्यक्ष गजानन बंगाळे, भगवानराव मोरे, बबनराव चेके, राणा चंदण, संजय इंगळे, सतीश मोरे, मयूर बोर्डे, अजीम, नितीन राजपूत, अनिल वाकोडे, गणेश शिंगणे, गोदरीच्या सरपंच लक्ष्मीबाई शेळके, उपसरपंच अभिमन्यु कर्‍हाडे, भागवत म्हस्के, राम अंभोरे, साजीद, संतोष परिहार, राजू मोरे, सरदारसिंग राजपूत, नवलसिंग राजपूत, छोटु झगरे, रामेश्‍वर परिहार, अमोल मोरे, नवृत्ती शेवाळे, प्रवीण राऊत, डॉ.जंजाळ, राहुल साबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

Web Title: If the farmers are not compensated for compensation within 15 days, the ministers will be censored

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.