शहरातील चतन्यवाडी भागात घर फोडी, शहर ठाण्यात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:36 AM2021-03-27T04:36:40+5:302021-03-27T04:36:40+5:30

बुलडाणा: शहरातील चैतन्यवाडीत एक घरफोडीची घटना समोर आली असुन जवळपास े दोन लाखाचा माल या घटनेत चोरी गेल्याची भीती ...

Home burglary in Chatanyawadi area of the city, case filed in city police station | शहरातील चतन्यवाडी भागात घर फोडी, शहर ठाण्यात गुन्हा दाखल

शहरातील चतन्यवाडी भागात घर फोडी, शहर ठाण्यात गुन्हा दाखल

googlenewsNext

बुलडाणा: शहरातील चैतन्यवाडीत एक घरफोडीची घटना समोर आली असुन जवळपास े दोन लाखाचा माल या घटनेत चोरी गेल्याची भीती व्यक्त होत आहे.या घरफोडीची तक्रार शहर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

बुलडाणा शहरातील चैतन्यवाडीत उल्का आणि गजानन अंतरकर शिक्षक दाम्पत्य राहते. गजानन अंतरकर आजारी असल्याने दोघे पती-पत्नी वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड येथे ११ मार्च पासून उपचारासाठी गेले होते. दरम्यान २५ मार्च रोजी सकाळी त्यांच्या शेजाºयांना अंतरकर यांचे घर उघडे असल्याचे दिसले.त्यांना चोरीचा संशय आल्याने त्यांनी ही बाब अंतरकर ह्यांना फोन वरून कळवली.त्यामुळे अंतरकर े संध्याकाळी घरी आले असता त्यांना दरवाजाचे कुलुप तुटलेले दिसले.घरातील बेडरूम मधील कपाट तोडून नगदी ३० हजार रुपये व सोने चाँदीचे दागीने असा आजच्या बाजार भाव किमतीनुसार जवळपास दीड ते पावणे दोन लाख रुपयांचा माल चोरीला गेल्याचे आढळून आले. उल्का गजानन अंतरकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Home burglary in Chatanyawadi area of the city, case filed in city police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.