शैक्षणिक साहित्यावरही जीएसटीचा भार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2017 12:41 AM2017-09-06T00:41:02+5:302017-09-06T00:41:29+5:30

जीएसटीचा भार विविध शैक्षणिक साहित्यावर पडला  असून,  १२ ते १८ टक्क्याने शैक्षणिक साहित्याचे दर वाढले आहेत.  या नव्या कर प्रणालीमुळे पालकांना अर्थिक भुर्दंड बसत आहे. 

GST burden on educational material | शैक्षणिक साहित्यावरही जीएसटीचा भार

शैक्षणिक साहित्यावरही जीएसटीचा भार

Next
ठळक मुद्देफटका जीएसटीचा१२ ते १८ टक्क्याने शैक्षणिक साहित्याच्या किमती वाढल्या नव्या कर प्रणालीमुळे पालकांना अर्थिक भुर्दंड 





लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: जीएसटीचा भार विविध शैक्षणिक साहित्यावर पडला  असून,  १२ ते १८ टक्क्याने शैक्षणिक साहित्याचे दर वाढले आहेत.  या नव्या कर प्रणालीमुळे पालकांना अर्थिक भुर्दंड बसत आहे. 
शैक्षणिक सत्र सुरू झाल्यापासून ते सत्र संपेपर्यंत विद्यार्थ्यांचे विविध  शैक्षणिक साहित्य खरेदी करणे सुरू असते. शाळेत होणारे  वेगवेगळ्या प्रयोग व उपक्रमासाठी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य  आणावे लागते. शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी विद्यार्थ्यांचा  पालकांकडे नेहमीच तगादा लावला जातो; परंतु १ जुलैपासून लागू  झालेल्या वस्तू आणि सेवा कर म्हणजे जीएसटीमुळे शैक्षणिक साहि त्यावरही परिणाम जाणवत आहे. या नव्या वस्तू आणि सेवा कर प्रणालीमुळे शैक्षणिक साहित्यांच्या करांमध्ये कमी जास्त प्रमाणात  बदल झाले आहेत. जीएसटीमुळे अनेक शैक्षणिक वस्तू महाग झाल्या  आहेत. मुलांच्या चित्रकलेच्या वह्या सोडल्या तर इतर अनेक साहि त्याचे दर वाढले आहेत. अभ्यास पुस्तिका, आलेख वही, प्रयोग वही,  साधे पेन, गणितीय साहित्य, भूमिती उपकरणे, कलर बॉक्स, पेन्सिल,  शॉपनर आदी साहित्यांवर १२ टक्के कर लावण्यात आला आहे.  फाउंटन पेन व शैलीलेखन पेन, साधे दप्तर याच्या किमती १८ टक् क्याने वाढल्या आहेत. तसेच लेदरच्या दप्तरच्या किमती २८ टक्क्याने  वाढल्या आहेत. यासह इतर शैक्षणिक साहित्यांच्या किमती वाढलेल्या  असतानाही आवश्यक असणार्‍या शैक्षणिक साहित्याच्या खरेदीवर  मात्र कुठलाच परिणाम जाणवत नाही. 

खाजगी शिकवणीवर १८ टक्के जीएसटी
खाजगी शिकवणी वर्ग गल्लीबोळात निर्माण झाले असून वाढत्या  शैक्षणिक स्पर्धेबरोबर शिकवणी वर्गांचे प्रमाणही झपाट्याने वाढत  आहे. या खाजगी शिकवणीवरही १८ टक्के जीएसटी लावण्यात  आलेली आहे. तसेच खाजगी शिकवणींना आता जीएसटीमध्ये  नोंदणीकरून घेणे आवश्यक आहे. त्यामुळे अधिकृत शिकवणी  वर्गांबरोबरच इतर शिकवणी चालकांनीही जीएसटीच्या नावाखाली  आपले दर वाढवलेले आहेत. 

Web Title: GST burden on educational material

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.