‘जलयुक्त शिवार’च्या कामांमुळे वाढली साखरखेर्डा परिसरातील भूजल पातळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2017 01:39 PM2017-11-07T13:39:35+5:302017-11-07T13:39:46+5:30

साखरखेर्डा : अवर्षणग्रस्त तालुका म्हणून ओळख असलेल्या सिंदखेड राजा तालुक्यातील साखरखेर्डा परिसरातील पाणीटंचाईची ही जिल्ह्यासाठी नवी नाही. त्यामुळे या टंचाईग्रस्त भागात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत विविध कामे  घेण्यात आली. त्याचे सकारात्मक दृश्य परिणाम आता समोर येत आहेत.

ground water level in the sakharkherda area was increased | ‘जलयुक्त शिवार’च्या कामांमुळे वाढली साखरखेर्डा परिसरातील भूजल पातळी

‘जलयुक्त शिवार’च्या कामांमुळे वाढली साखरखेर्डा परिसरातील भूजल पातळी

Next
ठळक मुद्देगाळ काढल्याने तलावातील जलसाठ्यात वाढ

साखरखेर्डा : अवर्षणग्रस्त तालुका म्हणून ओळख असलेल्या सिंदखेड राजा तालुक्यातील साखरखेर्डा परिसरातील पाणीटंचाईची ही जिल्ह्यासाठी नवी नाही. त्यामुळे या टंचाईग्रस्त भागात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत विविध कामे  घेण्यात आली. त्याचे सकारात्मक दृश्य परिणाम आता समोर येत आहेत.
२६ हजार लोकसंख्या असलेले साखरखेर्डा हे गाव आहे. गावच्या शिवारात मोठ्या प्रमाणावर जलयुक्त शिवारची कामे करण्यात आली. त्यामुळे वाहून जाणारे पाणी जमिनीत मुरत आहे. त्यामुळे परिसरातील विहीरींची पाणीपातळी वाढली आहे. त्यामुळे रब्बी हंगामामध्ये शेतकर्यांना सिंचनासाठी या पाण्याचा उपयोग चांगल्या पद्धतीने होत आहे.
येथील पाणीटंचाईची समस्याही हे अभियान राविल्यामुळे आता निकाली निघण्याच्या मार्गावर आहे. तसे या गावाला ऐतिहासिक आणि पौराणिक महत्त्व सुद्धा आहे. गावाच्या अवती भवती महालक्ष्मी, गायखेडी व काळ्या पाण्याचे असे तीन तलाव आहे. गावाला कोराडी प्रकल्पातून पाणी पुरविल्या जाते. गाव शिवारात ९० कामे उपक्रमातंर्गत मंजूर करण्यात आली होती तर ७९ कामे पुर्ण करण्यात आली आहेत. या संपूर्ण कामांची माहिती सिमनीक संकेतस्थळावर अपलोड करण्यात आली.

शेतकर्यांचा मिळाला प्रतिसाद
साखरखेर्डा गावच्या शिवारात अभियानातंर्गत सिमेंट नाला, बांधातील गाळ काढणे आणि खोलीकरण यासह ढाळीच्या बांधाच्या कामांना शेतकर्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पहिल्या वर्षी साखरखेर्डा गावाची निवड झाली आहे. त्याचप्रमाणे परिसरात १७ बंधार्यांचे खोलीकरण आणि रुंदीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे परिसरातील विहीरींना जलसंजीवनी मिळाली. त्याचप्रमाणे गावाच्या आसपास असलेल्या महालक्ष्मी, गायखेडी व काळ्या पाणी असलेल्या तलावातील लोकसहभागातून मोठ्या प्रमाणावर गाळ काढण्यात आला होता. १३ ठिकाणी नाला खोलीकरणाचीही कामे झाली आहे. तीनही तलावामधून दोन लाख ३० हजार ट्रॉली गाळ काढण्यात आला होता. त्यामुळे वर्षभरात येथील विहीरींना चांगले पाणी आले.
 

डाळींब शेतीकडे वळले शेतकरी
या भागातील शेतकरी आता डाळीं शेतीकडे वळले आहेत. काही ठिकाणी फुलशेतीही सुरू झाली आहे. भूजल पातळीतही या भागात झालेल्या कामामध्ये पूर्वीच्या तुलनेत सुधारणा झाली आहे.

Web Title: ground water level in the sakharkherda area was increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी