त्रुटींमुळे वंचित राहिलेल्या बुलडाणा जिल्हय़ातील २८ हजार शेतकर्‍यांना सोयाबीनचे अनुदान द्या - राहुल बोंद्रे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 12:00 AM2018-01-12T00:00:10+5:302018-01-12T00:01:43+5:30

जिल्हय़ातील सुमारे २८ हजार शेतकर्‍यांच्या अर्जांमध्ये त्रुटी आढळून आल्याने वंचित राहावे लागत आहे. ही बाब काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. राहुल बोंद्रे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत उपस्थित करून शेतकर्‍यांना त्रुटी पूर्ण करण्यासाठी संधी देण्याबरोबरच त्यांना अनुदान वितरित करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात यावा, अशी आग्रही मागणी पालकमंत्री ना. भाऊसाहेब फुंडकर यांच्याकडे केली आहे.

Give Soyabean Grant to 28,000 Farmers in Buldhana district who Distributed by Errors - Rahul Bondre | त्रुटींमुळे वंचित राहिलेल्या बुलडाणा जिल्हय़ातील २८ हजार शेतकर्‍यांना सोयाबीनचे अनुदान द्या - राहुल बोंद्रे 

त्रुटींमुळे वंचित राहिलेल्या बुलडाणा जिल्हय़ातील २८ हजार शेतकर्‍यांना सोयाबीनचे अनुदान द्या - राहुल बोंद्रे 

googlenewsNext
ठळक मुद्देराहुल बोंद्रे यांची पालकमंत्री ना. भाऊसाहेब फुंडकर यांच्याकडे मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
चिखली : खरीप २0१६-१७ मध्ये सोयाबीनचे भाव घसरल्याने शासनाने सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांना प्रतिक्विंटल २00 रुपये जाहीर केलेल्या अनुदानापासून जिल्हय़ातील सुमारे २८ हजार शेतकर्‍यांच्या अर्जांमध्ये त्रुटी आढळून आल्याने वंचित राहावे लागत आहे. ही बाब काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. राहुल बोंद्रे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत उपस्थित करून शेतकर्‍यांना त्रुटी पूर्ण करण्यासाठी संधी देण्याबरोबरच त्यांना अनुदान वितरित करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात यावा, अशी आग्रही मागणी पालकमंत्री ना. भाऊसाहेब फुंडकर यांच्याकडे केली आहे.
गत ऑक्टोबर ते डिसेंबर २0१६ या कालावधीत बाजार समितीमध्ये विक्री केलेल्या शेतकर्‍यांना प्रतिक्विंटल २00 रुपये व जास्तीत जास्त २५ क्विंटल प्रतिशेतकरी याप्रमाणे अनुदान शासनाने मंजूर केले होते.  यानुषंगाने जिल्ह्यात अर्ज केलेल्या ७८ हजार शेतकर्‍यांपैकी केवळ ५0 हजार ६८५ शेतकर्‍यांना अनुदान मंजूर करण्यात आले आहे. उर्वरित शेतकर्‍यांना त्रुटीअभावी अनुदान नामंजूर केल्या गेले. अर्ज केलेल्या शेतकर्‍यांच्या अर्जामध्ये असलेल्या त्रुटी पूर्ण करण्यासाठी त्यांना कुठलीही संधी न देता सरळ-सरळ त्यांचे अनुदान फेटाळण्याचा प्रकार प्रशासनाने केला असून, हा सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांवर अन्याय असल्याचे स्पष्ट करीत सदर शेतकर्‍यांना त्यांच्या अर्जातील त्रुटी पूर्ण करण्याची संधी देऊन त्यांना अनुदान वितरित करण्यात यावे, अशी मागणी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार राहुल बोंद्रे यांनी जिल्हा नियोजन समितीमध्ये पालमंत्री ना.भाऊसाहेब फुंडकर यांच्याकडे केली आहे. त्याचबरोबर शासनाने उर्वरित शेतकर्‍यांच्या त्रुटी पूर्ण करून घेऊन अनुदान न दिल्यास आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे. 

Web Title: Give Soyabean Grant to 28,000 Farmers in Buldhana district who Distributed by Errors - Rahul Bondre

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.