तळागळातील माणसाला मदतीचा हात द्या, गावाच्या विकासाकरीता एकत्र या - तहसिलदार सुरेश बगळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 01:47 PM2017-12-18T13:47:05+5:302017-12-18T13:47:47+5:30

 बुलडाणा :स्वत: पुरते न जगता इतरांसाठी जगा, समाजातील तळागळातील माणसाला मदतीचा हात द्या, गावाच्या विकासाकरीता एकत्र या, असे आवाहन तहसिलदार सुरेश बगळे यांनी जिल्हास्तरीय भाषण स्पर्धेच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी केले.

Give the man of the grass a helping hand, together for the development of the village - Tehsildar Suresh Bagale | तळागळातील माणसाला मदतीचा हात द्या, गावाच्या विकासाकरीता एकत्र या - तहसिलदार सुरेश बगळे

तळागळातील माणसाला मदतीचा हात द्या, गावाच्या विकासाकरीता एकत्र या - तहसिलदार सुरेश बगळे

Next
ठळक मुद्दे‘देशभक्ती और राष्ट्र निर्माण’ या विषयावर जिल्हास्तरीय भाषण स्पर्धेचे सोमवारला शिवाजी विद्यालय सभागृह बुलडाणा येथे उद्घाटन.

बुलडाणा : थोर परंपरा, संस्कृती असलेल्या या मातृभूमीत आपला जन्म झाला आहे. ज्या समाजात आपण वावरतो त्या समाजाचेही काही देणे आहे.  स्वत: पुरते न जगता इतरांसाठी जगा, समाजातील तळागळातील माणसाला मदतीचा हात द्या, गावाच्या विकासाकरीता एकत्र या, असे आवाहन तहसिलदार सुरेश बगळे यांनी जिल्हास्तरीय भाषण स्पर्धेच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी केले.
भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालया अंतर्गत असलेल्या नेहरु युवा केंद्र बुलडाणा व्दारा ‘देशभक्ती और राष्ट्र निर्माण’ या विषयावर जिल्हास्तरीय भाषण स्पर्धेचे सोमवारला शिवाजी विद्यालय सभागृह बुलडाणा येथे आयोजन करण्यात आले होते. या कार्यकमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यालयाचे प्राचार्य प्रा. दिलीप पराते, प्रमुख अतिथी म्हणून डॉ.विकास बाहेकर, प्रा.हरिश साखरे, प्रा.डॉ.अविनाश गेडाम, पटवारी गणेश देशमुख तर स्पधेर्चे परिक्षक एच.एन.पठाण्, प्रा.डॉ. गजानन वानखेडे, प्रा.डॉ.शिवाजी देशमुख हे उपस्थित होते. प्रमुख अतिथी  डॉ.विकास बाहेकर, प्राचार्य  दिलीप पराते यांनी मनोगत व्यक्त. सर्व प्रथम मान्यवरांच्या  हस्ते या स्पर्धेचे  प्रथम पारितोषीक अभिजीत  खोडके वडनेर भोलजी ता.नांदूरा, व्दीतीय माधुरी गवळी नांद्राकोळी, ता.बुलडाणा  तर तृतीय पारितोषीक कल्पना  जाधव, दहिद बु. यांनी पटकविले. बक्षीस वितरण मान्यवरांच्या  हस्ते प्रमाणपत्र देवून  गौरविण्यात आले. सर्वप्रथम स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व व्दिप प्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नेहरु युवा केंद्राचे अजयसिंग राजपूत यांनी केले. तर संचलन दिलीप महाले यांनी केले. आभार प्रा.हरिश साखरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी धनंजय चाफेकर, भागवत निकम, सतिश नारळकर, अविनाश मोरे, गणेश चव्हाण व श्री शिवाजी विद्यालयाचे कर्मचाºयांनी परिश्रम घेतले.

Web Title: Give the man of the grass a helping hand, together for the development of the village - Tehsildar Suresh Bagale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.