रुढी-परंपरेला फाटा देत  नातीने आजीला दिला चिताग्नी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2018 04:58 PM2018-07-04T16:58:46+5:302018-07-04T17:00:23+5:30

 नातीने आजीला चिताग्नी देऊन नवीन आदर्श प्रस्थापित केला.

girl perform funeral rituals of her grandmother at nanadura | रुढी-परंपरेला फाटा देत  नातीने आजीला दिला चिताग्नी

रुढी-परंपरेला फाटा देत  नातीने आजीला दिला चिताग्नी

Next
ठळक मुद्देचेतना ही आपल्या वडील व आईच्या निधना नंतर आपले स्वत:चे शिक्षण करत आपल्या म्हाताऱ्याआजीचा सांभाळ करत होती. ३ जुलै रोजी संध्याकाळी श्रीमती आशाबाई ह्यांचे निधन झाले व समोर प्रश्न आला जुन्या रुढी परंपरेला फाटा देत  चेतना हीने समोर टीटवे धरत आपल्या आजीला चिताअग्नी दीला.

 - सुहास वाघमारे        

 नांदुरा : बालपणी आईवडिलांचे छत्र हरवले त्यामुळे तालुकातल्या  अलमपुर येथिल एकुलती एक असलेल्या चेतना राजेंद्र देशमुख हिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला मात्र; त्याच वेळी वयोवृद्ध आजीने चेतनाला आधार दिला व तिचे संगोपन केले. पदवीपर्यंत तिला शिकवले.  चेतनाची आजी आशाबाई यांनी  ३ जुलै ला वृद्धापकाळाने जगाचा निरोप घेतला. यावेळी  अंत्यसंस्कार विधी व चिताअग्नी बाबत आप्तेष्ट व गावकऱ्यांनी चर्चा होत असताना माझ्या आजीने माझा सांभाळ केला त्यामुळे मीच माझ्या आजीला चिताअग्नी देणारा असा निर्णय चेतनाने घेत दिनांक ४जुलैच्या दुपारी आपल्या  नातीने आजीला चिताग्नी देऊन नवीन आदर्श प्रस्थापित केला.
अलमपुर येथील स्वर्गीय राजेंद्र नानाराव देशमुख याची मुलगी  चेतना ही आपल्या वडील व आईच्या निधना नंतर आपले स्वत:चे शिक्षण करत आपल्या म्हाताऱ्याआजीचा सांभाळ करत होती. ३ जुलै रोजी संध्याकाळी श्रीमती आशाबाई ह्यांचे निधन झाले व समोर प्रश्न आला तो चिताअग्नी देण्याचा.  तेंव्हा समोर होऊन चेतनाने आपल्या नातलगांना सांगितले,  'मी स्वत: माझ्या आजीला चिताअग्नी देते.'  त्या निर्णयाला सर्व नातलगांनी सहमती दर्शवली व ४ जुलै ला सकाळी ११  वाजता जुन्या रुढी परंपरेला फाटा देत  चेतना हीने समोर टीटवे धरत आपल्या आजीला चिताग्नी दीला.
 चेतना हीने घेतलेल्या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. तिने एक नवीन आदर्श प्रस्थापित केला.

Web Title: girl perform funeral rituals of her grandmother at nanadura

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.