खरिपाच्या तोंडावर शेतकर्‍यांचे खिसे रितेच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 01:07 AM2018-05-29T01:07:01+5:302018-05-29T01:07:01+5:30

जानेफळ : एकीकडे सूर्य आग ओकत असताना शेतकर्‍यांची मात्र तोंडावर आलेल्या खरीप हंगामासाठी लगबग सुरू झाली आहे. लग्न सराईचा धूमधडाका सध्या मुहूर्त नसल्यामुळे थांबलेला असल्याने शेतकरी शेतीच्या कामाकडे वळले आहेत. परंतु खिसे रिकामेच असल्याने कर्जासाठी शेतकर्‍यांची धडपड सुरू झाली आहे. मागील वर्षीची कर्जमाफी अद्यापपर्यंत अनेक शेतकर्‍यांना मिळालेली नाही. शेतकर्‍यांना तत्काळ कर्ज द्यावे, असे शासनाचे निर्देश असले, तरी बँकांना मात्र अद्यापपर्यंत आदेश मिळाले नसल्याचे बँक व्यवस्थापकाकडून सांगण्यात येत आहे. 

farmers waiting for fund to farming! | खरिपाच्या तोंडावर शेतकर्‍यांचे खिसे रितेच!

खरिपाच्या तोंडावर शेतकर्‍यांचे खिसे रितेच!

Next
ठळक मुद्देकर्ज वाटपाचा अद्याप आदेश नाही पैसा नसल्याने बळीराजा अडचणीत

लोकमत न्यूज नेटवर्क
जानेफळ : एकीकडे सूर्य आग ओकत असताना शेतकर्‍यांची मात्र तोंडावर आलेल्या खरीप हंगामासाठी लगबग सुरू झाली आहे. लग्न सराईचा धूमधडाका सध्या मुहूर्त नसल्यामुळे थांबलेला असल्याने शेतकरी शेतीच्या कामाकडे वळले आहेत. परंतु खिसे रिकामेच असल्याने कर्जासाठी शेतकर्‍यांची धडपड सुरू झाली आहे. मागील वर्षीची कर्जमाफी अद्यापपर्यंत अनेक शेतकर्‍यांना मिळालेली नाही. शेतकर्‍यांना तत्काळ कर्ज द्यावे, असे शासनाचे निर्देश असले, तरी बँकांना मात्र अद्यापपर्यंत आदेश मिळाले नसल्याचे बँक व्यवस्थापकाकडून सांगण्यात येत आहे. 
 शेतकर्‍यांच्या खात्यामध्ये पैसे नसल्याने त्यांची झोप उडाली आहे. गेल्या वर्षीचा हंगाम शेतकर्‍यांसाठी दुष्काळाचाच ठरला. मोठय़ा उत्साहाने पैशांची जुळवाजुळव करून शेतकरी तयार झाला. परंतु वरुणराजाने शेतकर्‍यांचे कंबरडेच मोडले होते. अत्यल्प पावसाने पिके सुकली, काही प्रमाणात झालेल्या पिकांवर बोंडअळी, किडींच्या प्रमाणामुळे उत्पादनात घट झाली आणि कसेबसे घरात आलेल्या शेतमालाला सुद्धा बाजार भाव न मिळाल्यामुळे कंबरडेच मोडले.
कर्जमाफीची घोषणा हवेतच जिरल्यामुळे आता पुन्हा शेतकरी कर्जाच्या खाईत सापडला आहे. खरीप हंगाम जवळ आल्याने बी-बियाणे व रासायनिक खतांसाठी आता पैसा कोठून आणाव,ा अशा विचारात पडला आहे. मात्र, शासनाने जणु काही शेतकर्‍यांसोबत पोरखेळच चालविला आहे. एकीकडे शेतकर्‍यांना तत्काळ कर्ज देण्याचे निर्देश देण्यात आल्याचे प्रसिद्धी माध्यमांसमोर सांगितल्या जात आहे, तर दुसरीकडे बँक प्रशासन आम्हाला पीक कर्ज वाटपाविषयी अद्याप कुठलेच आदेश मिळाले नसल्याचे सांगतात. त्यामुळे शेतकर्‍यांना चकरा माराव्या लागत आहेत.
यावर्षीच्या खरीप हंगामाची सुरुवात दरवाढीने होत आहे. रासायनिक खताच्या प्रतिबॅग १00 ते १२५ रुपयांची दरवाढ झालेली आहे. डीझलच्या दरवाढीचा सुद्धा फटका शेतकर्‍यांना बसत आहे. सध्याच्या यांत्रिकीकरणामुळे शेतीच्या नांगरणीपासून तर वखरणी, पेरणी, कीटकनाशके फवारणी आदी कामे ट्रॅक्टरद्वारेच केली जात आहेत. त्यामुळे डीझलचे भाव वाढल्याने ट्रॅक्टर मालकांनीसुद्धा भाववाढीचा निर्णय घेतला. शेतकर्‍यांना महागाईचा दुहेरी फटका बसत आहे.
७ जूनपासून मृग नक्षत्रास सुरुवात होत आहे. यावर्षी लवकरच पावसाला सुरुवात होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. परंतु शेतकर्‍यांच्या खिशाची कुठलीच सोय नसून, बँकेच्या कर्जाचीसुद्धा खात्री दिसत नाही. उधार उसणवारी करण्याससुद्धा कुणी तयार नसून, शेतीच्या नांगरणी, वखरणीसाठी ट्रॅक्टर मालकसुद्धा नगदी पैसे मागत असल्याने शेतकरी मोठय़ा अडचणीत सापडल्याचे चित्र दिसत आहे. 
 
Web Title: farmers waiting for fund to farming!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.