पाण्याअभावी दसरखेड 'एमआयडीसीती'ल उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 01:31 PM2019-05-16T13:31:19+5:302019-05-16T13:33:03+5:30

पाण्याअभावी दसरखेड एमआयडीसी परिक्षेत्रातील 'एमआयडीसीती'ल उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.  

Due to the lack of water, Industry in midc area on the closer way | पाण्याअभावी दसरखेड 'एमआयडीसीती'ल उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर 

पाण्याअभावी दसरखेड 'एमआयडीसीती'ल उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर 

Next

  - मनोज पाटील
मलकापूर :  मलकापूर तालुक्यात पाणी टंचाईचे सावट असून, पाण्याअभावी दसरखेड एमआयडीसी परिक्षेत्रातील 'एमआयडीसीती'ल उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.  

          वाढत्या तापमानामुळे जलसाठयातील पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होत चालले आहे. मानवी जिवा सोबतच जनावरांनाही पाणी टंचाईचे तीव्र चटके सहन करावे लागत आहेत. अशा पाणी- बाणी च्या परिस्थितीत एमआयडीसीतील उद्योग धंदे सुध्दा बंद पडण्याच्या मार्गावर येऊन ठेपले आहेत. 

           एमआयडीसी परिक्षेत्रात सद्यस्थितीत 25 ते 27 उद्योग सुरू असुन  यामध्ये सर्वाधिक पाण्याची गरज ही पुठठा  कारखाना, केमिकल कंपनी व बिर्ला  काॅटसीन आदी कंपन्यांना पडते. त्यामध्ये 7 क्राफ्ट पेपर व पेपर मिल, 3 केमिकल तर 1 टेक्स्टाईल्स कंपनी आहे. या कंपन्यांच्या  संपूर्ण उत्पादनात पाणी हा अविभाज्य घटक आहे. 

          पूर्णा  नदी पात्रातुन वाघोळा सबस्टेशन वरील जॅकवेल अंतर्गत या कंपन्यांना पाणी पुरवठा होत असतो. परंतु सद्यस्थितीत या उद्योगांना पाणी टंचाई ची चांगलीच झळ बसू लागली आहे. 15 दिवसाआधी वाघोळा सब स्टेशन वरील जॅकवेल मध्ये 11 टक्के पाणी होते. तर आठ दिवस आधी हतनूर धरणाचे दरवाजे उघडल्याने येथील पाणी पुढे तापी नदीच्या पात्रात वाहून गेले.

           सद्यस्थितीत येथे केवळ 2 टक्केच पाणीसाठा उपलब्ध आहे. केवळ हतनूर धरणाचे दरवाजे उघडल्यामुळे या जलसाठ्यातील जल अत्यंत कमी झाले. त्यामुळे उपलब्ध असलेल्या 2 टक्के पाण्यावर आता उद्योग कसा करायचा हा मोठा गंभीर प्रश्न उद्योजकांसमोर ठाण मांडून बसला आहे. तर उद्योग बंद पडल्यास या कंपन्यांमध्ये कार्यरत असलेल्या तब्बल 2 हजार कामगारांच्या रोजगाराचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.

             उद्योग बंद पडले तर शासनाचेही जीएसटी कराचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होणार आहे. त्यामुळे या समस्येकडे स्थानिक लोकप्रतिनिधींनी सह जिल्हाधिकारी व एमआयडीसी प्रशासनाने सुध्दा तातडीने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. तर पावसाळ्यापर्यंत किमान आता तरी हतनूर धरणाचे दरवाजे उघडल्या जाऊ नये. त्याचप्रमाणे एमआयडीसी चे पंपिंग जॅकवेल समोरून पुढे दोन किमी अंतरावर पाणी अडविणे करिता कोल्हापुरी बंधारा बांधल्या जाणेही तेवढेच गरजेचे झाले आहे.

             जेणेकरून येथे पावसाळ्यातील पाणी साठवून पाण्याची पातळी जैसे थे राहण्यास मदत होऊ शकते त्याचप्रमाणे अशा पाणी-बाणीच्या परिस्थितीत उद्योग सुरू राहण्याकरिता प्रत्येक उद्योजकाला प्रशासनाने त्या -त्या कंपनीत बोअर करण्याची परवानगी देणे आवश्यक झाले आहे किंबहुना तशी मागणीसुद्धा उद्योजकांकडून समोर येऊ लागली आहे . 


  यापुढे किमान उन्हाळाभर तरी हातनूर चे दरवाजे उघडल्या जाऊ नये जेणेकरून उपलब्ध असलेला पाणीसाठा तरी जैसे थे राहील. तसेच पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आता शासन प्रशासनाकडून त्यादृष्टीने कायमस्वरूपी उपाय योजनांची येथे नितांत झाली आहे.

- शेखर धरणगावकर, सचिव, एमआयडीसी असोसिएशन, दसरखेड 

Web Title: Due to the lack of water, Industry in midc area on the closer way

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.