ठळक मुद्दे शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून केली आत्महत्या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
मोताळा : शेतीच्या मालकी हक्काच्या वादात झालेल्या शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून शेख उस्मान शेख सुलतान (६५, रा. खरबडी) यांनी आत्महत्या केली, अशी तक्रार मृतकाच्या पत्नीने बुधवार, ८ नोव्हेंबर रोजी बोराखेडी पोलिसांत दिली. यावरून पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.      तालुक्यातील खरबडी येथील शेख उस्मान शेख सुलतान हे शिरवा शिवारात शेतात आईसह वास्तव्यास होते. मंगळवार, ७ नोव्हेंबरच्या सकाळी शेताच्या धुर्‍यावरील नीलमच्या झाडाला नायलॉन व सुतळीच्या दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळून आला. दरम्यान, बोराखेडी पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रवाना केला होता. याप्रकरणी शेख रफिक शेख लतीफ (रा. खरबडी) यांच्या फिर्यादीवरून बोराखेडी पोलिसांनी र्मग दाखल केला होता; परंतु मृतकाची पत्नी अकीला बी शेख उस्मान (५0) यांनी बुधवार, ८ नोव्हेंबर रोजी पोलिसांत तक्रार दिली.