दुष्काळात जगविलेली कपाशी वेधतेय लक्ष!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2019 05:34 PM2019-06-01T17:34:39+5:302019-06-01T17:35:45+5:30

पाण्याचे नियोजन करत जगविलेली कपाशी खामगाव ते भेंडवळ मार्गाने येणाºया-जाणाºया सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. 

cotton crop flourish in extreme heat condition |  दुष्काळात जगविलेली कपाशी वेधतेय लक्ष!

 दुष्काळात जगविलेली कपाशी वेधतेय लक्ष!

googlenewsNext

- देवेंद्र ठाकरे
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: सध्या सगळीकडे दुष्काळी परिस्थिती आहे. पाण्याचे दुर्भिक्ष्य असल्याने यावर्षी बागायती कपाशीची लागवड नसल्यातच जमा आहे. परंतु अशाही परिस्थितीत माटरगाव परिसरात एका शेतकºयाच्या शेतात कपाशीची रोपे डौलाने उभी आहेत. एकीकडे या परिसरात कोणत्याही शेतात पिक दिसत नसताना ठिबकच्या साह्याने पाण्याचे नियोजन करत जगविलेली कपाशी खामगाव ते भेंडवळ मार्गाने येणाºया-जाणाºया सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. 
गत चार वर्षांपासून पावसाचे प्रमाण सातत्याने घटत आहे. गतवर्षीची परिस्थती तर अतिशय बिकट होती. अत्यल्प पाऊस पडल्याने जमिनीत पाहिजे त्या प्रमाणात ओल झाली नाही. परिणामी संपूर्ण खरीप हंगाम हातचा गेला. पिके आली नाहीत, सगळीकडे दुष्काळ पडला. नदी-नाल्यांना पूर गेले नसल्याने जलाशये आटली. विहिरी, बोअरवेलला पाणी नाही. याचा परिणाम रब्बी हंगामावरही झाला. सध्याची परिस्थिती तर अतिशय भीषण आहे.  सगळीकडेच तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली. गावा-गावात प्यायला पाणी नाही. जिथे प्यायलाच पाणी नाही; तिथे पिकांचे तर बोलायलाच नको. त्यामुळेच यावर्षी बागायती कपाशीची लागवड नसल्यातच जमा आहे. जिकडे पाहावे तिकडे नांगरलेली शेती दिसून येते. सर्वच जण पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. ज्यांच्या विहिरींना थोडे-बहूत पाणी आहे, त्यांनीही बागायती कपाशीची लागवड करण्याची हिंम्मत केलेली नाही. बोटावर मोजण्या एवढ्या शेतकºयांनी कपाशी लागवडीचा प्रयोग केलाही असेल; तरीही अद्याप कोण्याच्याही शेतात डोलणारी कपाशीची रोपे, हे चित्र निदान घाटाखाली तरी दुर्मिळच म्हणावे लागेल. असे असले, तरी शेगाव तालुक्यातील माटरगाव ते भास्तन दरम्यान  एका शेतात कपाशीची रोपे डौलाने उभी असल्याचे दिसून येते. माटरगाव येथील गणेश सपकाळ यांच्या शेतातील हे दृष्य असून तब्बल ५ एकर क्षेत्रावर ‘ताशी’ लागलेली ही कपाशी रोडने येणाºया-जाणाºयांचे लक्ष वेधून घेत आहे.

 
विहिरीला आहे भरपूर पाणी!
एकीकडे अनेक गावांना पिण्यासाठी पाणी मिळत नसताना, माटरगाव येथील गणेश सपकाळ यांच्या विहिरीला सध्याही भरपूर पाणी आहे. त्यांच्या ५ एकर शेतातील कपाशी सगळ्यांचेच लक्ष वेधून घेत असली, तरी त्यांनी तब्बल १० एकरावर कपाशीची लागवड केली आहे. विहिरीला भरपूर पाणी असल्यानेच हे शक्य झाले आहे. विशेष म्हणजे या परिसरात हरणांचा प्रचंड त्रास आहे. संपूर्ण शेतशिवार खाली असताना एकाच शेतात कपाशीची रोपे दिसत असल्याने हरणांचे कळप कपाशी फस्त करतात. त्यामुळे रात्रंदिवस शेतात जागून कपाशी जपावी लागते, असे गणेश सपकाळ सांगतात.

Web Title: cotton crop flourish in extreme heat condition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.