पोलीस विभागाच्यावतीने जातीय सलोखा रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 11:30 PM2017-08-17T23:30:37+5:302017-08-17T23:30:47+5:30

मेहकर : समाजामध्ये एकोपा राहावा, नागरिकांमध्ये राष्ट्रीय एकात्मता निर्माण होऊन हिंदू-मुस्लीम बांधव गुण्यागोविंदाने राहावे, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये तसेच उत्सव, सण हे एकत्रितपणे साजरे होऊन गावात शांतता राहावी, यासाठी शहरातील नागरिकांनी पुढाकार घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक मोतीचंद राठोड यांनी केले.

Communal hatred rallies by the Police Department | पोलीस विभागाच्यावतीने जातीय सलोखा रॅली

पोलीस विभागाच्यावतीने जातीय सलोखा रॅली

Next
ठळक मुद्देनागरिकांनी उत्सव, सण शांततेत साजरे करण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क
मेहकर : समाजामध्ये एकोपा राहावा, नागरिकांमध्ये राष्ट्रीय एकात्मता निर्माण होऊन हिंदू-मुस्लीम बांधव गुण्यागोविंदाने राहावे, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये तसेच उत्सव, सण हे एकत्रितपणे साजरे होऊन गावात शांतता राहावी, यासाठी शहरातील नागरिकांनी पुढाकार घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक मोतीचंद राठोड यांनी केले.
गणेशोत्सव, पोळा, बकरी ईद या सणाच्या निमित्ताने मेहकर पोलीस विभागाच्यावतीने १७ ऑगस्ट रोजी शहरातून मुख्य मार्गाने जातीय सलोखा रॅलीचे आयोजन केले होते. यावेळी राठोड बोलत होते. उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्‍वर वैंजने यांनी रॅलीला हिरवी झेंडी दाखवून रॅलीला सुरुवात करण्यात आली. यावेळी न.पा. उपाध्यक्ष जयचंद बाठिया, शिवसेना तालुका प्रमुख सुरेश वाळूकर, नगरसेवक विकास जोशी, आरोग्य सभापती मनोज जाधव, नियोजन सभापती तौफीक कुरेशी, महाराष्ट्र अर्बनचे सल्लागार गजानन देशमुख आदी उपस्थित होते. 

लोणारात जातीय सलोखा रॅली
विविध सण-उत्सवांमध्ये शांतता राहावी, यासाठी येथे १७ ऑगस्ट रोजी जातीय सलोखा रॅली काढण्यात आली. यासाठी नगराध्यक्ष भूषण मापारी व ठाणेदार आर.पी. माळी यांनी विशेष पुढाकार घेतला. यावेळी उपनगराध्यक्ष साफियाबी बेगम नूर महम्मद खान, गटनेते शांतीलाल गुगलिया, आरोग्य सभापती शेख समद, काँग्रेस नेते नितीन शिंदे, बादशाह खान, भाजपा तालुकाध्यक्ष अँड.शिवाजी सानप, शिवसेना शहर प्रमुख पांडुरंग सरकटे, न.प.चे सर्व नगरसेवक तसेच पोलीस स्टेशनचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. 

सिंदखेडराजा पोलीस स्टेशनच्यावतीने रॅली
गणोशोत्सव, पोळा व बकरी ईद काळात शांतता राहावी, हा उदात्त हेतू समोर ठेवून जिल्हा पोलीस अधीक्षक शशिकुमार मीणा यांच्या संकल्पनेमधून सिंदखेडराजा पोलीस स्टेशनच्यावतीने शहरात गणेशोत्सव काळातील मार्गाने जातीय सलोखा रॅली काढण्यात आली. १७ ऑगस्ट रोजी शहरात शांतता कमिटीचे सर्व सदस्य, शाळा महाविद्यालये यांचे जवळपास ७00 ते ८00 विद्यार्थी या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. सिंदखेडराजा पोलीस स्टेशनचे ठाणेदार बळीराम गीते यांनी रॅलीचे आयोजन केले होते. रॅलीला तहसीलदार संतोष कणसे, नगराध्यक्ष अँड. नाझेर काझी, शिवाजी राजे जाधव यांनी हिरवी झेंडी दाखविली. यावेळी तहसीलदार संतोष कणसे, अँड.नाझेर काझी, असदबाबा, ठाणेदार बळीराम गीते यांनी मार्गदर्शन केले. यावेळी छगनराव मेहेत्रे, अँड.संदीप मेहेत्रे, राजेंद्र अंभोरे, जगन ठाकरे, मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी तसेच पोलीस उपनिरीक्षक संतोष नेमणार, सहायक पोलीस उपनिरीक्षक सुनील खेडेकर व पोलीस स्टेशनचे सर्व पोलीस कर्मचार्‍यांची उपस्थिती होती. 

Web Title: Communal hatred rallies by the Police Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.