चिखली : ‘बेटी बचाओ’ योजनेच्या नावाखाली फसवणूक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 01:53 AM2018-01-30T01:53:38+5:302018-01-30T01:54:46+5:30

चिखली शहर व तालुक्यात ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ योजनेचे अर्ज भरून घेतल्या जात असून, यासाठी २0 ते ५0 रुपये उकळल्या जात  असल्याचा प्रकार सुरू असल्याने या बाबीची गंभीरतेने दखल घेऊन प्रशासनाने गोरगरीब व सामान्य नागरिकांची पिळवणूक थांबविण्याची गरज निर्माण झाली आहे.

Chikhali: Cheating in the name of 'Beti Bachao' scheme! | चिखली : ‘बेटी बचाओ’ योजनेच्या नावाखाली फसवणूक!

चिखली : ‘बेटी बचाओ’ योजनेच्या नावाखाली फसवणूक!

googlenewsNext
ठळक मुद्देअर्जासाठी लोकांकडून पैसे उकळण्याचा प्रकार सुरूच!

लोकमत न्यूज नेटवर्क
चिखली : केंद्र सरकारच्या ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या योजनेच्या नावाने राज्यातील लाखो गरिबांना गंडा घातल्याचा प्रकार यापूर्वीच उघडकीस आल्यानंतर महिला व बालविकास मंत्नालयाने अशी कोणतीही घोषणा सरकारकडून करण्यात आलेली नाही, असे स्पष्ट केलेले असतानासुद्धा सद्यस्थितीत चिखली शहर व तालुक्यात ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ योजनेचे अर्ज भरून घेतल्या जात असून, यासाठी २0 ते ५0 रुपये उकळल्या जात  असल्याचा प्रकार सुरू असल्याने या बाबीची गंभीरतेने दखल घेऊन प्रशासनाने गोरगरीब व सामान्य नागरिकांची पिळवणूक थांबविण्याची गरज निर्माण झाली आहे.
शहरातील विविध प्रभागात तसेच तालुक्यातील अनेक गावात ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ योजनेंतर्गत मुलींच्या नावाने अर्ज भरून घेतल्या जात असून, सोबत सदर मुलीच्या आधार कार्डचा नंबर तसेच बँक खाते क्रमांक आदी महत्त्वपूर्ण कागदपत्रांची झेरॉक्स प्रत, फोटो आदी घेऊन हे अर्ज भरल्या जात असून, यासाठी प्रत्येकी २0 ते ५0 रुपये फी आकारली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. हा अर्ज भरल्यानंतर मुलीच्या लग्नाच्यावेळी दोन लाख रुपये मिळणार असल्याची अफवा पसरविण्यात आल्याने गोरगरीब नागरिक यास बळी पडत असून, खातरजमा न करता अर्ज भरून देण्यासह महत्त्वाच्या कागदपत्रांच्या झेरॉक्सप्रती अर्जासोबत दिल्या जात असल्याचे चित्र आहे. खरेच दोन लाख मिळणार असतील तर २0 ते ५0 रुपयांसाठी कशाला अधिक चौकशा करायच्या, या भावनेतून हा अर्ज भरून देण्यासाठी काही सुशिक्षित नागरिक देखील मागचा-पुढचा काही एक विचार न करता अर्ज भरून देत आहेत. विशेष बाब म्हणजे, गत नोव्हेबर, डिसेंबर मध्येच हे सर्व अर्ज बनावट असल्याचे सिद्ध झाले असून, याबाबत महिला व बालकल्याण मंत्रालयाने अशी कोणतीही योजना नसल्याचे स्पष्ट केले आहे. सोबतच याबाबत विविध वृत्तपत्रांत या अर्जांच्या नावाखाली होणारी फसवणूक उघड झालेली असताना राजरोसपणे फसवणुकीचा हा प्रकार सुरू असून, यामध्ये गोरगरिबांची पिळवणूक होत आहे. या अर्जासोबत आधार कार्डची झेरॉक्स प्रत, फोटो व बँक खात्याची इत्थंभूत माहिती देण्यात येत असल्याने कदाचित या दोन्हीही बाबींचा भविष्यात गैरवापर केला जाऊ शकतो, ही बाब संबंधित लक्षात घेत नसल्याचे स्पष्ट होत आहे. 

काय आहे ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’  योजना
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २२ जानेवारी २0१५ रोजी या योजनेची घोषणा केली आहे. स्त्नी-भ्रूणहत्या थांबावी, मुलींना सुरक्षा व शिक्षण मिळावे, हा या योजने मागचा उद्देश आहे. या योजनेंतर्गत राष्ट्रीयीकृत बँकेत किंवा पोस्टात  सुकन्या समृद्धी योजना हे खाते सुरू करता येते. यासाठी मुलीचे वय दहा वर्षापेक्षा कमी असणे गरजेचे आहे. या खात्यात सदर मुलीच्या आई- वडिलांनी किंवा पालकांनी वर्षभरात कमीतकमी एक हजार तर जास्तीत जास्त दीड लाख रूपये जमा करावयाचे आहेत. सदर खाते सुरूवात झाल्याच्या तारखेपासून २१ वर्षांनी याची मुदत संपते. त्यानंतरच यातील रक्कम मिळू शकते; मात्न मुलगी अठरा वर्षांची झाल्यानंतर जमा रकमेच्या निम्मी रक्कम तिच्या उच्चशिक्षणासाठी किंवा लग्नासाठी काढता येते. सुरुवातीला या खात्यातील रकमेवर व्याजदर जास्त होता. सन २0१७-१८ साठी तो ८.४ टक्के एवढा निर्धारित करण्यात आला आहे. 

व्यापक जनजागृतीचा अभाव
‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या योजनेच्या नावाने राज्यातील लाखो गरिबांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर महिला व बालकल्याण मंत्रालयाने अशी कोणतीही घोषणा सरकारकडून करण्यात आलेली नाही, असे स्पष्ट करण्यासह ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ उपक्रमाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जातील. तसेच ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ उपक्रमांतर्गत कोणतेही वैयक्तिक लाभ मिळत नाहीत किंवा कोणताही थेट रक्कम बँक खात्यांमध्ये वळती केली जात नाही, हे जाहिरातींच्या माध्यमातून बिंबवण्याचा प्रयत्न करण्याचे स्पष्ट केले होते; मात्र त्यानुसार व्यापक प्रमाणावर जनजागृती न झाल्याने नागरिकांची फसवणूक अद्यापही सुरूच आहे.

अशी योजना असती तर किती प्रपोगंडा झाला असता; मात्र अशी कुठलीही योजना नसल्याचे चौकशी अंती स्पष्ट झाले आहे. तथापि आपल्याकडेही या योजनेच्या नावाखाली फसवणुकीचा प्रकार सुरू असून, फसवणूक करणार्‍यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.
- मनिषकुमार गायकवाड, तहसीलदार, चिखली.

Web Title: Chikhali: Cheating in the name of 'Beti Bachao' scheme!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.