विदर्भ-मराठवाड्यात दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी चक्का जाम - राजू शेट्टींची घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2018 07:10 PM2018-10-02T19:10:38+5:302018-10-02T19:12:45+5:30

१९ आॅक्टोंबरला विदर्भ-मराठवाड्या चक्का जाम आंदोलनाची हाक स्वाभीमानी शेतकरी संघटने संस्थापक अध्यक्ष खा. राजू शेट्टी यांनी दोन आॅक्टोबर रोजी बुलडाण्यात दिली.

Chakka Jam on 19 october in Vidarbha-Marathwada - Raju Shetty | विदर्भ-मराठवाड्यात दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी चक्का जाम - राजू शेट्टींची घोषणा

विदर्भ-मराठवाड्यात दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी चक्का जाम - राजू शेट्टींची घोषणा

Next
ठळक मुद्दे विदर्भात आयोजित पहिल्या सोयाबीन-कापूस परिषदेमध्ये ते बोलत होते. डॉलरच्या तुलनेत रुपया घसरून सोयाबीन व भुईमूगाच्या पिकाचे भाव घसरल्याचे खा. राजू शेट्टी यांनी पुढे बोलताना स्पष्ट केले.

बुलडाणा: विदर्भ-मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करून, सोयाबीन-कापसाच्या भावासाठी दसऱ्याला शस्त्रपुजन करून दुसऱ्या दिवशी अर्थात १९ आॅक्टोंबरला विदर्भ-मराठवाड्या चक्का जाम आंदोलनाची हाक स्वाभीमानी शेतकरी संघटने संस्थापक अध्यक्ष खा. राजू शेट्टी यांनी दोन आॅक्टोबर रोजी बुलडाण्यात दिली. विदर्भात आयोजित पहिल्या सोयाबीन-कापूस परिषदेमध्ये ते बोलत होते. दरम्यान, दाळवर्गीय शेती माल आणि सात लाख क्विंटल पामतेल आयात केल्याने देशाच्या परकीय गंगाजळीला फटका बसल्याने आर्थिक स्थिती दोलायमान झाल्यानेच डॉलच्या तुलनेत रुपया घसरला आहे.देशाच्या आर्थिक व्यवस्थेला मोदी सरकारने दोलायमान केल्यानेच डॉलरच्या तुलनेत रुपया घसरून सोयाबीन व भुईमूगाच्या पिकाचे भाव घसरल्याचे खा. राजू शेट्टी यांनी पुढे बोलताना स्पष्ट केले. स्थानिक गर्दे वाचनालयाच्या सभागृहामध्ये दोन आॅक्टोबर रोजी ही सोयीबन-कापूस परिषद आयोजित केली होती. यावेळी स्वाभीमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर, प्रा. डॉ. प्रकाश पोफळे, माजी मंत्री सुबोध मोहिते, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रसिता ढगे, चंद्रशेखर साळुंके, साईनाथ अण्णा, मारोती वर्हाडे, शर्मिला येवले, दामोधर इंगोले यांच्यासह अन्य उपस्थित होते. खा. राजू शेट्टी पुढे म्हणाले की, शेतकरी पीक विमा योजना ही शेतकर्यांचे नाव वापरून शासनाच्या तिजोरीवर टाकलेला दरोडा आहे. त्यामुळे ही योजना पंतप्रधान कॉर्पाेरेट योजना असून परदेशातून आयात केलेला माल आणि ही कॉर्पाेरेट योजना उद्योजकांच्या भल्यासाठीची योजना आहे. त्यामुळे देशासाठी हे मोदी निर्मित संकट आहे. पुढील काळात सत्ताधार्यांच्या पाठीत लाथ घालून त्यांना दूर ठेवा. विदर्भ-मराठवाड्यात सोयाबीन-कापूस परिषदेच्या माध्यमातून आता पश्चिम महाराष्ट्रातील ऊस व दुध आंदोलनाच्या धर्तीवर ही एक निर्णायक लढाई करण्याच्या तयारीत स्वाभीमानी शेतकरी संघटना आली असल्याचे खा. शेट्टी म्हणाले. विदर्भ-मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करून सोयाबीन व कापसाला हेक्टरी ५० हजार रुपयांची नुकसान भरपाई द्यावी, सोयाबीनसह, बोंडअळीमुळे गेल्या वर्षी झालेल्या नुकसानाची भरपाई द्यावी, नाफेडमार्फत खरेदी केंद्र सुरू करावेत, यासह विविध मागण्याांसाठी सिमोलंघनानंतर शेतकर्यांसाठी विदर्भ-मराठवाड्यात चक्का जाम करून सोयाबीन-कापसाच्या भावासाठीच्या निर्णायक लढ्यासाठी तयार रहावे, असे आवाहन त्यांनी केले. झेंडे बाजूला सारून शेतकर्यांनी एकजूट दाखवावी-तुपकर पश्चिम विदर्भाप्रमाणेच विदर्भातही शेतकर्यांनी त्यांच्या खांद्यावरील झेंडे बाजूला सारून कापूस-सोयाबीनच्या भावासाठी एकजूट दाखवावी. बुलडाण्याचे पाणी पळविण्याचा पाणीपुरवठा मंत्री लोणीकर यांनी घाट घालू नये. ते लोणीकर असतील तर आपण तुपकर आहोत. मुळातच बुलडाणा जिल्ह्याचा विकासदर कमी आहे. त्यात शेतकरी आत्महत्या होत असताना ही बाब योग्य नसल्याचे तुपकर म्हणाले. जिल्ह्यात प्रक्रिया उद्योगही नाहीत. जिल्ह्यात मंजूर करण्यात आलेलेल्या टेक्सटाईल पार्कचे पुढे काय झाले हे ही सत्ताधारी भाजपाने सांगावे, असा टोला त्यांनी लगावला.

Web Title: Chakka Jam on 19 october in Vidarbha-Marathwada - Raju Shetty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.