बुलडाणा: टिटवी येथे प्रथमच पार पडला आदिवासी जन-जागृती मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2018 02:23 PM2018-02-06T14:23:43+5:302018-02-06T14:27:26+5:30

लोणार : समाजात असलेल्या अनिष्ठ प्रथा घालवून शासकीय योजनांचा लाभाद्वारे समाजाला प्रबोधन करण्यासाठी तालुक्यातील टिटवी येथे प्रथमच रविवारी आदिवासी जन-जागृती मेळावा घेण्यात आला.

Buldhana: Adivasi Jan-Jagruti programme at Titvi village | बुलडाणा: टिटवी येथे प्रथमच पार पडला आदिवासी जन-जागृती मेळावा

बुलडाणा: टिटवी येथे प्रथमच पार पडला आदिवासी जन-जागृती मेळावा

Next
ठळक मुद्देटीटवी येथे हजारो आदिवासी बांधवांच्या उपस्थिती मध्ये आदिवासी जन-जागृती मेळवा घेण्यात आला. मेळाव्याला कळमनुरी विधानसभा आमदार डॉ.संतोष टारफे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. क्रांतिवीर बिरसा मुंडा आदिवासी संघटना बुलडाणा जिल्हाध्यक्ष भगवानराव कोकाटे तसेच तालुका आदिवासी कर्मचारी संघटना लोणार यांच्यावतीने करण्यात आलेले होते.

लोणार : समाजात असलेल्या अनिष्ठ प्रथा घालवून शासकीय योजनांचा लाभाद्वारे समाजाला प्रबोधन करण्यासाठी तालुक्यातील टिटवी येथे प्रथमच रविवारी आदिवासी जन-जागृती मेळवा घेण्यात आला. या मेळाव्याचे आयोजन क्रांतिवीर बिरसा मुंडा आदिवासी संघटना बुलडाणा जिल्हाध्यक्ष भगवानराव कोकाटे तसेच तालुका आदिवासी कर्मचारी संघटना लोणार यांच्यावतीने करण्यात आलेले होते. तालुक्यातील टीटवी येथे हजारो आदिवासी बांधवांच्या उपस्थिती मध्ये आदिवासी जन-जागृती मेळवा घेण्यात आला. या मेळाव्याला कळमनुरी विधानसभा आमदार डॉ.संतोष टारफे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विविध ठिकाणावरून आलेल्या मान्यवरांचे गावकºयांच्या वतीने स्वागत करण्यात आले. कार्यक्रम प्रसंगी बोलताना आ.डॉ.संतोष टारपे यांनी सांगितले की, आदिवासी संस्कृतीचा एक मोठा इतिहास आहे. मात्र आदिवासी समाजात अनिष्ठ प्रथा व अंधश्रद्धा यामुळे हा समाज मागे पडत आहे. समाजाची प्रगती साधायची असेल, तर अनिष्ठ प्रथा, रुढी व परंपरा यांना फाटा देऊन समाजातील तरुणांनी शिक्षणाची कास धरावी. हिंगोली जिल्ह्यातील जि.प.सदस्य डॉ.सतीश पाचपुते यांनीही युवकांना मार्गदर्शन केले. यावेळी जि.प. सदस्य गोदावरी कोकाटे, ज्ञानेश्वर सोळंके, आॅड.वसंतराव गव्हाळे, हिंगोली येथील जि.प.सदस्य चंद्रभागा जाधव, रामेश्वर फुपाटे, गजानन सोळंके, पंढरी कोकाटे, केशव फुपाटे, निवृत्ती धोत्रे, बबन तनपुरे, दत्ता शिंदे, ज्ञानेश्वर राठोड, सोपान सोळंके, शिवाजी पांडे यांचेसह आदिवासी बांधव मेळाव्याला उपस्थित होते.

Web Title: Buldhana: Adivasi Jan-Jagruti programme at Titvi village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.