बुलडाणा : सखी मंच सदस्य नोंदणीस प्रारंभ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 12:20 AM2018-01-25T00:20:49+5:302018-01-25T00:21:26+5:30

बुलडाणा : महिलांच्या कलागुणांना संधी मिळावी, त्यांचा आत्मविश्‍वास वाढावा, त्यांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे, त्यांचे मनोरंजन व्हावे, या हेतूने लोकमत सखी मंचच्या माध्यमातून राज्याच्या कानाकोपर्‍यात तीन लाख सदस्यांचे व्यासपीठ मागील १७ वर्षांपासून चालू आहे.

Buldana: Sakhi forum member registration begins! | बुलडाणा : सखी मंच सदस्य नोंदणीस प्रारंभ!

बुलडाणा : सखी मंच सदस्य नोंदणीस प्रारंभ!

googlenewsNext
ठळक मुद्देनोंदणी करताच मिळणार हजारोंची बक्षिसे व मनोरंजनात्मक कार्यक्रमाची रेलचेल!

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : महिलांच्या कलागुणांना संधी मिळावी, त्यांचा आत्मविश्‍वास वाढावा, त्यांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे, त्यांचे मनोरंजन व्हावे, या हेतूने लोकमत सखी मंचच्या माध्यमातून राज्याच्या कानाकोपर्‍यात तीन लाख सदस्यांचे व्यासपीठ मागील १७ वर्षांपासून चालू आहे.
बुलडाणा जिल्ह्यात यास प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. २0१७ या वर्षी अकोला शहरात बरेचसे कार्यक्रम सखी मंचच्या सदस्यांसाठी घेण्यात आले. यात लावणी, स्पर्धा, सत्कार, कौतुक सोहळे, स्नेहमेळावे, ऋणानुबंध घट्ट करणारे अनेक उपक्रम आणि कार्यक्रम घेण्यात आले. कार्यक्रम, आवडते गिफ्ट या माध्यमातून सखी मंच हा परिवार दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. दरवर्षी हजारो महिला या उपक्रमाचा आणि कार्यक्रमांचा आनंद घेत असतात. दरवर्षी नवनवीन सदस्य या कुटुंबात येऊन सामील होतात. यंदाही या अनोख्या व्यासपीठाची सदस्य नोंदणी बुलडाणा शहरासाठी लवकरच चालू होत आहे. नोंदणी शुल्क ५00 रुपये व जुन्या सदस्यांस ४५0 रुपये आहे (२0१६ चे ओळखपत्र जमा केल्यास) सदस्य नोंदणी करताच वर्षभर वेगवेगळ्या कार्यक्रमाची पर्वणी तर मिळणारच आहे; पण त्याशिवाय हजारोंची आकर्षक तसेच दैनंदिन जीवनात उपयोगी पडणार्‍या भरपूर सार्‍या भेटवस्तूदेखील मिळणार आहेत.
यावर्षीही नोंदणीसाठी शहरातील वेगवेगळ्या विभागातील विभाग प्रमुखांकडे आणि लोकमत कार्यालयात फॉर्म उपलब्ध असणार आहेत. सदस्य नोंदणी केल्यानंतर आकर्षक बक्षिसांमध्ये ६0३ रुपये किमतीचा व्हिज्युअल किचन कॉम्बो सेट तसेच सखी मंच ओळखपत्र, कूपन बुक, वार्षिक भाग्यवंत सोडत या योजनादेखील लागू होणार आहेत. शिवाय, यावर्षी राज्यस्तरीय गोल्डन धमाकामधून भाग्यवंत सखीला एक लाख रुपयापर्यंतचे सोन्याचे दागिने जिंकण्याची संधीदेखील मिळणार आहे. 
हमखास वस्तू, कूपन्सच्या माध्यमातून प्रत्येक सखीला बरेच बक्षिसे मिळणार आहेत. २0१८ या येत्या वर्षी अनेक बहारदार कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. विविध स्पर्धा, कार्यशाळा, सांस्कृ तिक, साहित्यिक, कलाविष्कार, मनोरंजनात्मक कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी महिलांनी तत्काळ लोकमत कार्यालय, चोपडा ले-आउट, संगम चौक, बस स्टॅन्डजवळ, बुलडाणा. फोन 0७२६२-२४२६२४ या क्रमांकावर किंवा आपल्या विभागातील सखी मंचच्या विभाग प्रमुखांशी संपर्क साधून जास्तीत जास्त महिलांनी या अनोख्या उपक्रमामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. 

सखी मंच सदस्यता नोंदणी करताच प्रत्येक सखीस हमखास बक्षीस मिळणार

  • - ६0३ रुपये किमतीचा व्हिज्युअल किचन कॉम्बो  सेट.
  • - आकर्षक सखी मंच ओळखपत्र.
  • - राज्यस्तरीय सोडतीद्वारे  गोल्डन धमाका.

Web Title: Buldana: Sakhi forum member registration begins!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.