अवैध सावकारी प्रकरणात दोघांना जामीन नाकारला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2017 12:27 AM2017-11-08T00:27:58+5:302017-11-08T00:31:22+5:30

सावकाराच्या  जाचाला कंटाळून खामगाव येथील एकाच कुटुंबांतील तिघांनी  विष प्राशन केले होते. यामध्ये एकाचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी खामगाव न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर  आरोपींनी  खंडपीठात धाव घेतली होती.

Both were denied bail in the illegal moneylender case | अवैध सावकारी प्रकरणात दोघांना जामीन नाकारला

अवैध सावकारी प्रकरणात दोघांना जामीन नाकारला

Next
ठळक मुद्देनागपूर खंडपीठाचा निकालकोणत्याही क्षणी होणार अटक

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव:  येथील दोन अवैध सावकारांचा अटकपूर्व जामीन  अर्ज  नागपूर खंडपीठाने फेटाळला. अवैध सावकाराच्या  जाचाला कंटाळून खामगाव येथील एकाच कुटुंबांतील तिघांनी  विष प्राशन केले होते. यामध्ये एकाचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी खामगाव न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर  आरोपींनी  खंडपीठात धाव घेतली होती.
जोहार्ले ले-आऊटमधील देवेंद्र जामोदे यांच्यासह त्यांचे वडील  श्रीराम जामोदे आणि भाऊ नरेंद्र जामोदे यांनी अवैध सावकार  निर्मला रामचंद्र कबाडे यांच्याकडून व्याजाने पैसे घेतले होते. पर तफेड केल्यानंतरही अवैध सावकारांकडून अतिरिक्त पैशांसाठी   तगादा लावल्या जात होता. निर्मला कबाडे यांचा भाऊ प्रकाश  रामकृष्ण गावंडे याने देवेंद्र जामोदे यांचा कोर्टासमोरील पानठेला  नोटरीकरून ताब्यात घेतला होता. अवैध सावकाराच्या जाचाला  कंटाळून   देवेंद्र जामोदे(३५),  श्रीराम जामोदे (६५), नरेंद्र  जामोदे (३0) यांनी २३ सप्टेंबरला विष प्राशन केले. यात नरेंद्र  जामोदेंचा मृत्यू झाला होता. देवेंद्र  जामोदेंच्या बयाणावरून  प्रकरणात गुन्हे दाखल झाले होते. प्रकरणात आता खंडपीठाने  आधीचा निकाल कायम ठेवत आरोपींचा अटकपूर्व जामिन  नाकारला. पोलिस त्यांच्या शोधात आहे. मुख्य आरोपी प्रकाश  गावंडे आणि निर्मला कबाडे  फरार आहेत.

ठाकूर याला ४८ तासात हजर होण्याचे आदेश !
खामगावातील एका प्रकरणात विजयसिंह ठाकूर याचाही जामीन  ७ नोव्हेंबरला नागपूर खंडपीठाने नाकारला.दरम्यान, ठाकूर यास  ४८ तासाच्या आत न्यायालयात हजर होण्याचे आदेश  न्यायालयाने दिले आहेत. ठाकूर याच्या शोधार्थही पोलिसांनी प थक रवाना केले आहे.

Web Title: Both were denied bail in the illegal moneylender case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.