ठळक मुद्देभाजपाच्यावतीने जल्लोष पुतळा परिसरात फटाक्यांची आतषबाजी 

लोकमत न्यूज नेटवर्क
चिखली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गतवर्षी आठ नोव्हेंबर रोजी घोषणा केलेल्या नोटाबंदी निर्णयास एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त तसेच जगभरात मंदीचे वातावरण असताना भारताची अर्थव्यवस्था रुळावर ठेवण्याचे काम भाजप सरकारने केले असल्याने या निर्णयाच्या सर्मथनार्थ चिखलीत भाजपाच्यावतीने ८ नोव्हेंबर रोजी ‘काळा पैसाविरोधी दिन’ साजरा करण्यात आला.
यानिमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळय़ास अभिवादन करून व पुतळा परिसरात फटाक्यांची जोरदार आतषबाजी करून भाजपाच्यावतीने जल्लोष साजरा करण्यात आला. 
दरम्यान, यापश्‍चात पार पडलेल्या कार्यक्रमात प्रमुख पदाधिकार्‍यांनी पक्षाने घेतलेल्या नोटबंदीच्या निर्णयाचे फायदे विशद करून नोटबंदीमुळे ज्यांच्याकडे काळा पैसा होता, त्यांची अडचण झाली. अशा लोकांचा सरकारविरोधी रोष व्यक्त होणे स्वाभाविक होते. जनआक्रोशच्या नावाखाली असाच रोष आता काळा पैसेवाले व्यक्त करणार असून, विरोधकांकडून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे पदाधिकार्‍यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले. यावेळी सर्व भाजपा पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

फटाके फोडून मोताळ्यात नोटबंदीचे सर्मथन
मोताळा : नोटबंदीच्या एक वर्षपूर्तीच्या पार्श्‍वभूमीवर मोताळ्यात भाजपतर्फे फटाके फोडून सर्मथन करण्यात आले. काळा पैसा, काश्मीरमधील दहशतवाद तसेच अन्य राज्यातील नक्षलवाद रोखण्यासाठी ८ नोव्हेंबर २0१६ हा नोटबंदीचा साहसी व ऐतिहासिक झाला. हा निर्णय घेत असताना त्यांनी राजकीय परिणामांची भीती बाळगली नाही. कारण राजकीय हितापेक्षा त्यांना राष्ट्रहित महत्त्वाचे आहे. नोटबंदीचा निर्णय भारतीय अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी देशाच्यो दृष्टीने सर्वार्थाने फायद्याचा असल्याचे मत मोताळा भाजपा तालुकाध्यक्ष मनोहर नारखेडे यांनी नोटबंदीस वर्षपूर्तीनिमित्त मोताळा येथे झालेल्या कार्यक्रमात व्यक्त केले. मोताळा येथील भाजपा कार्यालयासमोर फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला. 


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.