टंचाईनंतर बुलडाणा जिल्ह्यात युरीयाचा साठा उपलब्ध

By admin | Published: September 11, 2014 12:23 AM2014-09-11T00:23:50+5:302014-09-11T00:23:50+5:30

बुलडाणा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात १५0 टन युरीयाचा साठा उपलब्ध.

After the scarcity, there are stocks of urea in Buldhana district | टंचाईनंतर बुलडाणा जिल्ह्यात युरीयाचा साठा उपलब्ध

टंचाईनंतर बुलडाणा जिल्ह्यात युरीयाचा साठा उपलब्ध

Next

खामगाव : यावर्षी शेतकरी आस्मानी संकटाने त्रस्त झाला अस तानाच ऐनवेळी पिकांना आवश्यक युरीयाची टंचाईमुळे त्रस्त झाला होता. मात्र जिल्ह्यात २ हजार मेट्रिक टन युरीया उपलब्ध झाला असून जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात १५0 टन याप्रमाणे कृषी केंद्रांना उपलबध्य करुन देण्यात आला आहे. या उपलब्ध युरीयाचे कृषी सहाय्यकांच्या उपस्थितीत प्रति शेतकरी २ बॅग या प्रमाणे वाटप होणार आह अशी माहिती कृषी विभागाने दिली आहे. विशेष म्हणजे युरीयाची कृत्रिम टंचाई शेतकर्‍यांची अडवणूक याबाबतचे वृत्त ह्यलोकमतह्णमध्ये ८ सप्टेंबर रोजी प्रकाशित झाले होते. गेल्या काही दिवसांपासून शेतकर्‍यांची युरीयासाठी अडवणूक केल्या जात होती. तर जादा किंमत दिली तर सहजरित्या युरीया उपलब्ध होत होता. २८१ रुपये निर्धारित किंमत असलेल्या युरीयाच्या एका बॅगसाठी शेतकरी पाहून ४00 ते ४२५ अशी मनमानीपणे कृषी केंद्रचालकांकडून विक्री करण्यात येत होती.

Web Title: After the scarcity, there are stocks of urea in Buldhana district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.