अखेर नाफेडमार्फत शेतमाल खरेदी केंद्र सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 12:16 AM2017-10-31T00:16:58+5:302017-10-31T00:17:18+5:30

मेहकर: मेहकर येथे शासनाकडून नाफेडमार्फत खरेदी केंद्र सुरू  करण्यात आले आहे. उडीद, मूग, सोयाबीन या पिकांची हमी  भावाने खरेदी सुरू करण्यात आली आहे. आ. संजय रायमुलकर  यांच्या हस्ते या नाफेड खरेदी केंद्राचा शुभारंभ ३0 ऑक्टोबर  रोजी करण्यात आला.

After all, the commodity purchasing center was started by Nafed | अखेर नाफेडमार्फत शेतमाल खरेदी केंद्र सुरू

अखेर नाफेडमार्फत शेतमाल खरेदी केंद्र सुरू

Next
ठळक मुद्देशेतकर्‍यांनी लाभ घेण्याचे रायमुलकर यांचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क
मेहकर: मेहकर येथे शासनाकडून नाफेडमार्फत खरेदी केंद्र सुरू  करण्यात आले आहे. उडीद, मूग, सोयाबीन या पिकांची हमी  भावाने खरेदी सुरू करण्यात आली आहे. आ. संजय रायमुलकर  यांच्या हस्ते या नाफेड खरेदी केंद्राचा शुभारंभ ३0 ऑक्टोबर  रोजी करण्यात आला.
यामध्ये उडीद ५ हजार ४00 रुपये, मूग ५ हजार ५७५ रुपये,  सोयाबीन ३ हजार ५0 रुपये या हमी भावाने खरेदी करण्यात  येणार आहे. सदर खरेदी ऑनलाइन पद्धतीने नोंद करून करण्या त येत असून, ज्या शेतकर्‍यांची ऑनलाइन नोंद झाली आहे,  अशा शेतकर्‍यांची उडीद, मूग, सोयाबीनची खरेदी सुरू करण्यात  आली आहे. यावेळी शेतकर्‍यांनी २0१७-१८ चा नोंद झालेला  सातबारा, पेरेपत्रक, आधारकार्ड, बँक पासबुकची झेरॉक्स  खरेदी-विक्री संघाकडे सादर करून ऑनलाइन नोंद करून आ पला माल विक्रीसाठी आणावा. ज्या शेतकर्‍यांची ऑनलाइन नोंद  नसेल त्यांचा धान्यमाल खरेदी करण्यात येणार नाही. शेतकर्‍यांनी  या नाफेड खरेदीचा लाभ घेण्याचे आवाहन आ. संजय  रायमुलकर यांनी केले आहे. शेतकरी भास्कर गोडे यांचा यावेळी  सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला कृषी उत्पन्न बाजार  समितीचे सभापती माधव जाधव, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष  मधुकर रहाटे, उपाध्यक्ष विनोद बापू देशमुख, संचालक भागवत  देशमुख, विनायक बोडखे, मोतीराम काळे पाटील, विजय  काळे, रविकुमार चुकेवार, उपसभापती बबनराव तुपे, सुरेश  काळे, नारायण काबरा, गजानन भोकरे, दत्ता पाटील शेळके,  रामेश्‍वर बोरे, सहायक निबंधक ए.एस. काटकर, सहायक  निबंधक प्रतिनिधी जी.आर. फाटे, जिल्हा मार्केटिंग अधिकारी  प्रतिनिधी खरात, कृषी उत्पन्न बाजार समिती सचिव श्री.भि.  बंगाळे, खरेदी-विक्री संघाचे व्यवस्थापक गिरीश वडुळकरसह  कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: After all, the commodity purchasing center was started by Nafed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती