जनुना तलावाकडे होतेय प्रशासनाचे दुर्लक्षच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2019 03:41 PM2019-02-12T15:41:33+5:302019-02-12T15:41:47+5:30

खामगाव : दीडशे वर्षांपूर्वी शहरालगत तयार करण्यात आलेल्या जनुना तलावाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते. त्यामुळेच आज हा तलाव कोरडा पडला आहे.

The administration is ignoring the Januna Lake! | जनुना तलावाकडे होतेय प्रशासनाचे दुर्लक्षच!

जनुना तलावाकडे होतेय प्रशासनाचे दुर्लक्षच!

googlenewsNext

-  योगेश फरपट

खामगाव : दीडशे वर्षांपूर्वी शहरालगत तयार करण्यात आलेल्या जनुना तलावाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते. त्यामुळेच आज हा तलाव कोरडा पडला आहे.
प्राप्त माहितीनुसार, १८६७ मध्ये खामगाव शहरात ४०० विहिरी होत्या. तेव्हा खामगाव शहराची लोकसंख्या ९४३२ एवढी होती. त्यावेळी फक्त विहीरीतीलच पाणी पिण्यासाठी वापरले जायचे. लोकसंख्या जसजशी वाढत गेली तसतसा पाणीप्रश्न बिकट होवू लागला. २० आॅगस्ट १८८१ रोजी पाण्याच्या प्रश्नावर विचारविनिमय करण्यासाठी तत्कालीन उपआयुक्तांनी नागरिकांची सभा बोलावली. त्यांनी जनुना हद्दीतील छोट्याश्या पाण्याच्या साठ्याचे रुपांतर मोठ्या तलावात निर्माण करण्याचा विचार समोर आला. त्यातून खामगाव शहरालगत १ लाख ५७ हजार ०३२ रुपये खर्चातून प्रशस्त जागेवर जनूना तलावाची निर्मिती झाली. त्यावर पाणीपुरवठा योजना कार्यान्वीत करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून अनेक वर्षे खामगावकरांची तहान भागवल्या जावू लागली. विशेष म्हणजे या पाणीपुरवठा योजनेसाठी कमी दाब लागत असल्याने विजेची बचत झाली. दरम्यान १९५२ मध्ये निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांच्या हाती नगरपालिकेचा कारभार आला. दरम्यान पाण्याचा भयंकर दुष्काळ आल्याने तलावातील पाणी आटू लागले. त्यामुळे पर्यायी व्यवस्था म्हणून सुटाळा बोर्डी योजना, दिवठाणा योजना अस्तिवात आल्या. सद्यस्थितीत माटरगाव येथील ज्ञानगंगेवर बांधण्यात आलेल्या धरणातून खामगावला शहराला पाणीपुरवटा केला जात आहे. या योजनेवर कोट्यवधी रुपये मागील कालखंडात खर्च झाले. मात्र जनूना तलावाकडे पुर्णपणे दुर्लक्ष झाल्याची वास्तविकता आहे. जनूना तलावाच्या परिसरात एमआयडीसी सुद्धा आहे. एमआयडीसीमधील अनेक उद्योग पाण्याअभावी बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.


मशिनरीसह पाईपलाईन सडण्याच्या मार्गावर!
जनूना तलावातून खामगाव शहरात करण्यात आलेली लाखो रुपयांची पाईपलाईन तशीच पडून आहे. तलावात पाणी नसल्याने पाणीपुरवठा योजना बंद पडली असली तरी पाईपलाईनचा उपयोग मात्र दुसरीकडे झाला नाही. मशिनरीज सुद्धा मातीमोल झाल्या.

 

Web Title: The administration is ignoring the Januna Lake!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.