असह्य पाठदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 05:18 PM2018-09-18T17:18:48+5:302018-09-18T17:21:56+5:30

चार वर्षांपूर्वी कंबरदुखीने बेजार एक गृहस्थ माझ्याकडे आले होते. सुरुवातीचे बोलणे झाल्यावर लक्षात आले की कंबरदुखीला निमित्त फक्त गाडीवरून जाताना बसलेल्या धक्क्याचे झाले. पण धक्का मात्र जबरदस्त बसला होता. धक्का बसल्यावर पाठ दुखणे, कंबर दुखणे सुरु झाले. एवढ्यावरच थांबले नाही. पायात चमका निघणे, मुंग्या येणे सुरू झाले. काही दिवसांनी उजव्या पायात कडकपणा आला. डॉक्टरांकडे गेल्यावर त्यांनी एमआरआय करायला सांगितले. एमआरआयमध्ये एल३-एल४-एल५ या मणक्यांमध्ये खूप जास्त दाब (कॉम्प्रेशन) आल्याचे स्पष्ट दिसत होते. उजव्या पायात रॅडिक्युलोपॅथी दिसत होती. म्हणून फिजियोथेरपी घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. पण त्याने काही विशेष आराम किंवा फरक पडला नाही.

Uncomfortable back pain | असह्य पाठदुखी

असह्य पाठदुखी

googlenewsNext
ठळक मुद्देकेरळीय पंचकर्माने समस्या बरी

चार वर्षांपूर्वी कंबरदुखीने बेजार एक गृहस्थ माझ्याकडे आले होते. सुरुवातीचे बोलणे झाल्यावर लक्षात आले की कंबरदुखीला निमित्त फक्त गाडीवरून जाताना बसलेल्या धक्क्याचे झाले. पण धक्का मात्र जबरदस्त बसला होता. धक्का बसल्यावर पाठ दुखणे, कंबर दुखणे सुरु झाले. एवढ्यावरच थांबले नाही. पायात चमका निघणे, मुंग्या येणे सुरू झाले. काही दिवसांनी उजव्या पायात कडकपणा आला. डॉक्टरांकडे गेल्यावर त्यांनी एमआरआय करायला सांगितले. एमआरआयमध्ये एल३-एल४-एल५ या मणक्यांमध्ये खूप जास्त दाब (कॉम्प्रेशन) आल्याचे स्पष्ट दिसत होते. उजव्या पायात रॅडिक्युलोपॅथी दिसत होती. म्हणून फिजियोथेरपी घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. पण त्याने काही विशेष आराम किंवा फरक पडला नाही. त्यामुळे न्यूरोसर्जनने शस्त्रक्रिया करण्यास सांगितले. त्यानंतर लगेच त्यांचे आॅपरेशन करण्यात आले. आॅपरेशन केल्यावर थोडे बरे वाटत होते. पण काही दिवसातच त्यांच्या दोन्ही पायातील संवेदना नाहीशा झाल्या. न्यूरोसर्जनने पुन्हा शस्त्रक्रिया करण्यास सांगितले. ती पण केली. पण विशेष आराम पडला नाही.
केरळीय पंचकर्माने ही समस्या बरी होऊ शकते असे त्यांना कळले आणि इथे कोण असे पंचकर्म करून देते याचा शोध घेत ते माझ्याकडे येऊन पोहचले. पोहचले काय! त्यांना उचलूनच क्लिनिकमध्ये आणले होते. आॅपरेशन आणि त्यांच्या परिस्थितीला फक्त दीड महिना झाला होता. त्यामुळे केरळीय पंचकर्माने ते लवकर बरे होऊ शकतील असे मला मनापासून वाटत होते. म्हणून त्यांना औषधोपचारासाठी तीन ते साडे तीन महिने द्यावे लागतील असे सांगितले. त्यातले अडीच महिने पंचकर्मासाठी लागतील याची त्यांना कल्पना दिली.
पहिल्या दिवशी, अभ्यंगम व स्वेदन केले. दुसऱ्या दिवसापासून पुढे सात दिवस एलाकिडी केले. सोबत बस्ती व नस्यम सुरु केले. एलाकिडीमुळे रक्तसंचार वाढून विषाक्तता कमी झाली. सोबतच पाठीच्या मणक्यातील शिथिलता वाढली. दुसºया आठवड्यात चार-पाच लिटर तेलाने पिडिचिल केले. पिडिचिल करताना नाडी व दोषानुसार तेलाची निवड केली. यामुळे संपूर्ण शरीरातील वात कमी होऊन, रक्तसंचार वाढून स्नायू, मांसपेशी, मज्जारज्जू, कंडरा व शीरा सगळ्यांना मजबूती मिळण्यास मदत झाली. जोडीला नस्यम व बस्ती होतेच.
तिसऱ्या आठवड्यात नवराकिडी केले. यामध्ये बल्यद्रव्यांचा आणि नाडीनुसार, संवेदना प्राप्त करून देणाऱ्या औषधी द्रव्यांचा उपयोग केला. पुढे एकूण दोन आठवडे हाच उपचार केला. नस्यम ब बस्ती सुरुच ठेवले. पाचव्या आठवड्यात पुन्हा एलाकिडी, नस्यम, बस्ती केले. पाठीच्या कण्यावर विशिष्ट औषधी द्रव्यांचा लेप दिला. ही प्रक्रिया १५ दिवस केली.
सातव्या आठवड्यात पुन्हा नवराकिडी, नस्यम व बस्ती केले. नस्यममुळे डोक्यातील विषद्रव्यांचा संचार बाहेर पडला तसेच मेंदूच्या हालचाली वाढून बल मिळाले व त्यामुळे मज्जारज्जूलासुद्धा बल मिळाले व तो पुनरुज्जीवित होऊ लागला. तसेच बस्तीमुळे हाडांवर, वातावर, मज्जारज्जूवर एकत्रित कार्य झाले. या सगळ्यामुळे जवळपास चार आठवड्यात पायांना संवेदना जाणवू लागल्या, हालचाल वाढली. आठव्या आठवड्यातही हेच उपचार केले. यामुळे आठव्या आठवड्याच्या शेवटी-शेवटी ते स्वत:च्या पायावर उभे राहून एक-एक पाऊल टाकू लागले. त्यांना ७०-८० टक्के आराम पडला.
नवव्या आठवड्यात पुन्हा पिडिचिल केले. औषधी द्रव्यांचा लेप पाठीला दिला. तसेच शिरोबस्ती पण केली. दहाव्या आठवड्यात थलपोडिचिल केले. अभ्यंगम व स्वेदन केले. पाठीच्या कण्याला लेपनही केले.
अभ्यांतर औषध रचनेत पाठीच्या कण्यावर, मज्जारज्जूवर व मेंदूवर कार्य करुन पाठीच्या कण्यातील स्निग्धता वाढवणाऱ्या, मजबूती निर्माण करणाऱ्या औषधी दिल्या.
या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे ते गृहस्थ पूर्णपणे बरे झाले. त्यांना व्यवस्थित चालता येऊ लागले. आज ते सर्वसामान्य आयुष्य जगत आहेत.

पाठदुखी असल्यास
१) महायोगराज गुग्गुळाच्या दोन-दोन गोळ्या तीन वेळा घेण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे वात आणि कफ कमी होण्यास मदत होते.
२) सहचरादि कषाय टॅब्लेट दोन-दोन गोळ्या तीनदा जेवणापूर्वी. यामुळे पाठीच्या कण्याचा स्तंभ दूर होण्यास मदत होते.
३) पुनर्नवादी कषाय टॅब्लेट दोन-दोन गोळ्या तीनदा. प्रकृती बलाबलानुसार दिल्या जातात. यामुळे इजा झालेल्या ठिकाणची सूज कमी होण्यास मदत होते.
४) कॅल्सिप्लस टॅब्लेट - कॅल्शियमने हाडांची मजबूती वाढून मणक्याची मजबूती वाढते.
५) टॅब्लेट सर्विलॉन / सायटिलॉन / स्पाँडिलॉन / गंधतेल आवश्यकतेनुसार पोटातून दिले जाते. याने पाठीच्या कण्यातील वंगण वाढते.
६) एखादा पाचक योग म्हणून दीपन-पाचन-रोचन करणारी (चव आणणारी) औषधे दिली जातात. त्यामध्ये विशेषत्वाने आमपाचक वटी, चित्रकादि वटी अशा प्रकारची औषधे दिली जातात. सोबतच स्नायूंची आणि कंडरांची मजबूती वाढवणाऱ्या अश्वगंधारिष्ट, अमृतारिष्ट, मृतसंजीवनी, बलारिष्ट, दशमुलारिष्ट, दशमुलजिरकारिष्ट अशा औषधांचा उपयोग केला जातो.
७) बडीशेप, देवदार, रुईचा चीक, वचनाग (वत्स्नाग), हिंग, सैंधव यांचा लेप केला असता अस्थिगत वात, कटीगत वात (कमरेचा वात / दुखणे), संधिगत वात यांचा नाश होतो.
८) अश्वगंधाचे चूर्ण तूप-साखरेचे अनुपान ठेऊन खावे (सोबत खावे).
९) सूंठ व एरंड बीज सोलून दोन्ही ९०-९० ग्राम. घ्यावे. साखर व तूप १८०-१८० ग्राम घ्यावे व तुपामध्ये एरंडाची बीजे भाजून नंतर १ शेर दुधात (२५० मिलि.)सर्व आटवून खवा झाल्यावर रोज शक्तीप्रमाणे ५-१० ग्राम खावे. याने कमरेतील वात निघतो.
१०) सूंठसिद्ध तेल रोज रात्री ५-१० मिलि. घ्यावे.
११) रेडिक्युलोपॅथी (पायात चमका, शिळका, मुंग्या येणे, जडपणा जाणवणे) जास्त असल्यास एरंडाचे मूळ, रिंगणी, बेल, महांळुंग (मोठा नीम) यांची मुळे घ्यावी. पाषाणभेद, सूंठ, मिरी पिंपळी यांचा काढा करून त्यामध्ये जवखा, हिंग, सैंधव, एरंडेल तेल घालून सकाळ-संध्याकाळ हा काढा सेवन करण्यास द्यावा. याने मोठ्या प्रमाणावर पाठीचा वात आणि शूल कमी होण्यास मदत होते. हे औषध १५-३० दिवस घ्यावे.

घरगुती उपाय

१) गरम पाण्यात मीठ घालावे. त्यामध्ये टॉवेल बुडवून व्यवस्थित पिळून, पोटावर झोपून, त्या टॉवेलने पाठ शेकावी. लगेच आराम मिळतो.
२) दररोज नारळ तेल किंवा सरसो तेल यामध्ये चार-पाच लसणाच्या कळ्या टाकायच्या. कळ्या काळ्या होईपर्यंत तेल गरम करून त्याने पाठीला हलके मालिश करावे.
३)ओवा तव्यावर हलक्या आचेवर गरम करावा. थंड झाल्यावर थोडे चावून गिळून टाकावा. नियमित सेवन केल्यास कमरेचा त्रास कमी होतो.
४) नरम गादीवर झोपू नये.
५) वातव्याधी कमी करण्यासाठी सहचर, देवदार, सूंठ यांचा काढा नियमित घ्यावा.

डॉ. नीतेश खोंडे
मोबाईल क्र. ९६६५०५२९२९

Web Title: Uncomfortable back pain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.