डॉक्टरांची वेळ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 01:11 AM2018-02-11T01:11:09+5:302018-02-11T01:11:29+5:30

एका सत्य घटनेपासून सुरुवात करू. एकदा एक शिक्षक आणि प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञांचा बाह्यरुग्ण विभाग सुरू होता. त्यांनी १० मिनिटांसाठी कॉफी पिण्यासाठी ब्रेक घेतला. यावर गर्दीतील एका रुग्णाने त्यांच्या केबिनमध्ये येऊन तुम्ही एवढे रुग्ण रांगेत थांबलेले असताना, केबिनमध्ये कॉफी पित बसले आहात,याबद्दल त्याने नाराजी व्यक्त केली.

Doctor's time ... | डॉक्टरांची वेळ...

डॉक्टरांची वेळ...

Next

- डॉ. अमोल अन्नदाते

ते कालं जानाति ! सफलं प्राप्यति !!
एका सत्य घटनेपासून सुरुवात करू. एकदा एक शिक्षक आणि प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञांचा बाह्यरुग्ण विभाग सुरू होता. त्यांनी १० मिनिटांसाठी कॉफी पिण्यासाठी ब्रेक घेतला. यावर गर्दीतील एका रुग्णाने त्यांच्या केबिनमध्ये येऊन तुम्ही एवढे रुग्ण रांगेत थांबलेले असताना, केबिनमध्ये कॉफी पित बसले आहात,याबद्दल त्याने नाराजी व्यक्त केली. आमचे शिक्षक त्यांना म्हणाले की, मी बाहेर बसलेल्या सर्व लहान बालकांच्या भल्याकरिता माझे पैसे खर्च करून ही कॉफी घेतो आहे. कारण सकाळपासून सतत रुग्ण तपासत असल्यामुळे मला खूप थकवा आला आहे. माझा दहा मिनिटांचा कॉफीचा ब्रेक आपण सहन केलात, तर मी आपल्या बाळाला नीट तपासू शकेन. या घटनेवरून असे लक्षात येईल की, डॉक्टरांच्या वेळेचे गणित हे बºयाचदा त्यांच्या हातात नसते. याचे मुख्य कारण म्हणजे आकस्मिक उद्भणारी इमर्जंसी, पण तरीही वेळेचे गणित सांभाळत मनाचा व मेंदूचा तजेला टिकवून ठेवण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर असते. म्हणून आपल्या डॉक्टरांची वेळ कशी वापरावी व डॉक्टरांच्या मिळालेल्या वेळेचा आपल्याला जास्तीतजास्त फायदा कसा करून घ्यावा, हे रुग्णांनी शिकून घ्यायला हवे. व्यस्त बाह्यरुग्ण विभागात डॉक्टर बºयाचदा तुम्हाला जास्तीतजास्त ५ मिनिटे देऊ शकतात. हे माझ्याही प्रॅक्टिसमध्ये होते. खरे तर डॉक्टरांसाठी ही पाच मिनिटे निदान करण्यासाठी पुरेशी असतात, पण या वेळेचा प्रभावी वापर करून घेणे ही जबाबदारी रुग्णावरही असते. आपल्याला काय त्रास होतो आहे, डॉक्टरांना कोणकोणत्या गोष्टी सांगायच्या आहेत, कुठला मागील वैद्यकीय इतिहास आहे (टी्िरूं’ ऌ्र२३ङ्म१८) याचे एक टिपण शक्यतो डॉक्टरांकडे जाण्याआधी तयार करावे. जर आपला डॉक्टर अपॉइंटमेंट सीस्टिम राबवत असेल, तर शक्यतो वेळ घेऊनच डॉक्टरांकडे जावे.
बरेच रुग्ण डॉक्टरांकडे गेल्यावर तक्रारी सांगण्याऐवजी इतर कुठल्या डॉक्टरांकडे गेलो होतो व त्यांच्या उपचारांचा कसा काहीच उपयोग झाला नाही, याचे पाल्हाळ लावतात. बºयाचदा डॉक्टरांनी आम्हाला खूप कमी वेळ दिला, अशी रुग्णांची तक्रार असते. गरज असणाºया, तसेच निदान लक्षात न आल्यास एखाद्या रुग्णाला डॉक्टर अधिक वेळही देतातच. बºयाचदा एक रुग्ण तपासत असताना, रांगेतला इतर रुग्ण जास्त सीरियस असल्यास त्याला आधी तपासावे लागते. अशा वेळी बाह्यरुग्ण विभागातील इतर रुग्णांनी समजून घ्यावे.
रात्री येणाºया रुग्णांबाबतीत कित्येकदा असे दिसून येते की, दोन-तीन दिवसांपासून आजारी असलेले रुग्ण हे मध्यरात्री दाखविण्यासाठी येतात. हा डॉक्टरांच्या वेळेचा अपव्यय आहे. बºयाच रुग्णांना डॉक्टरांना वारंवार फोन करून शंका विचारण्याची सवय असते. अगदी इमर्जंसी असल्यास फोन करायला हरकत नाही, पण क्षुल्लक गोष्टींसाठी फोन करणे चुकीचे आहे.
डॉक्टरांची वेळ ही त्यांची नसून ती रुग्णांचीच वेळ असते. ती तुम्ही जितकी परिणामकारक वापराल, तितका तुमचा फायदा होईल.

Web Title: Doctor's time ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :doctorडॉक्टर