गौणखनिजसह बेकायदेशीर खते रोखण्याचे आव्हाऩ़़!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 10:47 PM2018-06-30T22:47:30+5:302018-06-30T22:47:46+5:30

Challenges to prevent illegal fertilizer with mineral resources! | गौणखनिजसह बेकायदेशीर खते रोखण्याचे आव्हाऩ़़!

गौणखनिजसह बेकायदेशीर खते रोखण्याचे आव्हाऩ़़!

Next

- देवेंद्र पाठक, धुळे
जिल्ह्यात सध्या विविध क्राईमच्या घटनांसोबतच गौणखनिजची होणारी चोरटी वाहतूक आणि त्याची पोलीस दप्तरी होणारी नोंद ही महसूल आणि पोलिसांसाठी नवी डोकेदुखी ठरत आहे़ गौणखनिज ठेका दरवर्षी घेतला जातो़ त्याचे रितसर पैसे देखील मोजले जातात़ असे असूनही बिनधास्तपणे गौणखनिजाची वाहतूक चोरट्या मार्गाने होत असेल तर ही बाब गांभिर्याने घेण्याची आवश्यकता आहे़ डंपर अथवा ट्रक अडवून गुन्हा दाखल केला जातो़ यावर न थांबता पुन्हा त्या मार्गावर अथवा त्या ठिकाणाहून गौणखनिजाची चोरटी वाहतूक होणार नाही, यासाठी ठोस उपाययोजना आखायला हवी, मात्र तसे काही होताना दिसत नाही़ 
आता पावसाचे दिवस असल्याने शेती कामाला मोठ्या प्रमाणावर सुरुवात झाली आहे़ शेतकºयांनी देखील प्रशासनाची मदत घेऊनच खते, बियाणे आणि किटकनाशकाचा उपयोग करण्याची आवश्यकता आहे़ पण, देवपुरातील कॉलनी परिसरात कृषी विभागाने छापा टाकून बेकायदेशीर खतांचा साठा पकडला आहे़ ही कारवाई कृषी विभागाने केली असलीतरी त्यांना पोलिसांनी देखील त्यांच्या पाठीशी तातडीने उभे राहण्याची गरज आहे़ ही कारवाई केवळ कागदोपत्री होता कामा नये़ हा साठा कोणाचा, कुठून आणला, त्याची होणारी विल्हेवाट आणि त्यातून शेतकºयांच्या शेतीपिकांचे होणारे संभाव्य नुकसान ही बाब खरोखरच गांभिर्याने घेण्याची आवश्यकता आहे़ गांजा प्रकरणाने देखील आपले डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे़ स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेली माहिती आणि अवधान टोलनाक्यावर पकडण्यात आलेले वाहन लक्षात घेता गांजाची ही तस्करीच असल्याचे समोर येत आहे़ १५ किलो त्याचे प्रमाण असल्याने यामागे नेमके कोण, गांजा कुठून आणला आहे, त्याची विल्हेवाट कुठे होणार होती, अजून याप्रकरणी कोणी संशयित वाढणार आहेत का, असल्यास त्यांच्या पर्यंत धुळे पोलीस पोहचणार आहेत का, असे विविध प्रश्न आता चर्चेत येत आहेत़ शहरासह जिल्ह्यात सुरु असलेले जुगाराचे अड्डे बंद होण्याचे नाव घेताना दिसत नाही़ पोलिसांकडून कारवाई होत असताना पुन्हा त्यांचे हे धंदे सुरुच कसे होतात़ यावरुन पोलिसांचा वचक संपतोय का, पोलिसांचा धाक उरला नाही का, असे म्हणण्याची वेळ येऊन ठेपली आहे़ जुगार अड्डाचे प्रमाण वेळीच रोखण्याचे मोठे आव्हान आता पोलिसांना पेलावे लागणार आहे़ मात्र, तात्पुरती कारवाई करुन पुन्हा जैसे थैच होत असल्याचे चित्र समोर येत आहे़ हे कुठेतरी थांबायलाच हवे़ पोलिसांनी ही बाब गांभिर्याने घेण्याची गरज आहे़ मात्र, कारवाई केवळ कागदोपत्रीच दिसते़ असे विविध प्रकार या आठवड्यात सुरु असताना दुसरीकडे मात्र एकतर्फी प्रेमाच्या आणि त्यातून मुलींना होणाºया जाचाच्या घटना काही कमी होताना दिसत नाही़ रस्त्यात अडविणे, त्यांना त्रास देणे असे प्रकार होत असतील तर ते देखील रोखण्याची आवश्यकता आहे़ जो कोणी असेल त्याला वेळीच ठेचले पाहीजे़ जेणेकरुन दुसरा कोणी अशी हिम्मत करणार नाही़ पण, ही हिम्मत धुळे पोलिस दाखवतील का? हाच मुळात प्रश्न आहे़ क्राईमसोबतच अशा घटनाकडे वेळीच लक्ष देण्याची आवश्यकता येऊन ठेपली आहे़

Web Title: Challenges to prevent illegal fertilizer with mineral resources!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.