इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा,​​​​​​​ विषय-गणित. घटक- सरळव्याज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2019 11:26 AM2019-02-15T11:26:16+5:302019-02-15T11:37:11+5:30

इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा,​​​​​​​ लेख -35, विषय-गणित. घटक- सरळव्याज

Etc. 5th scholarship examination, subject mathematics. Component- DirectView | इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा,​​​​​​​ विषय-गणित. घटक- सरळव्याज

इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा,​​​​​​​ विषय-गणित. घटक- सरळव्याज

googlenewsNext
ठळक मुद्देइ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा,​​​​​​​ लेख -35विषय-गणित. घटक- सरळव्याज

इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा, लेख -35, विषय-गणित. घटक- सरळव्याज

महत्त्वाचे मुद्दे 

  1. मुद्दल- म --- ठेवीदाराने/ खातेधारकाने बॅँकेत ठेवलेल्या किंवा कर्ज घेतलेली रक्कम
  2. मुदत ---क -- कालावधी
  3.  दर -- द-- प्रत्येक 100 रुपयांसाठी 1 वर्षासाठी मोबदला
  4. व्याज- बॅँक ठेवीबद्दल देणारी अथवा कर्जासाठी जादा रक्कम बॅँके ला द्यावी लागते.
     
  •  काही सूत्रे

 

  • सरळ व्याज = म x  द x क :100
  • मुद्दल = 100 x व्याज : मुदत x दर
  • दर = 100 x व्याज : मुदत x मुददल
  • मुदत = 100 x  व्याज : मुदत x मुद्दल
  • रास = मुद्दल + व्याज
     

नमुना प्रश्न

(1) राहुलने 15000 रुपये 3 वर्षासाठी काही दराने संतोषला वापरायला दिले. संतोषने त्याला 4500 रु. व्याज दिले, तर व्याजाचा दर दसादशे किती असेल?

(1) 10 (2) 15 (3) 9 (4) 8
स्पष्टीकरण - म = 15000, क = 3 , द = ?, व्याज = 4500
द = (100 x व्याज) : (15000 x 3)
उत्तर - 10 येईल.

(2) रोहितला द. सा. द. शे 7 दराने एका मुद्दलाचे 3 वर्षाचे सरळव्याज रु. 2520 मिळाले, तर मुद्दल किती (2018)
(1) 15000 (2) 21600 (3)1500 (4) 12000
स्पष्टीकरण = द = 7 क = 3, व्याज = 2520
मुद्दल =?
मुद्दल = (100 x व्याज) : (द x क)
= (100 x 2520) : (7 x 3)
मुद्दल = 12000 रु.
पर्याय क्र. 4 बरोबर

(3) 500 रु. मुद्दलाचे दसादशे 8 दराने 3 वर्षाचे सरळव्याज किती? (2018)
(1) 240 (2) 120 (3) 500 (4) 400
स्पष्टीकरण - म = 500, द= 8, क= 3
व्याज = ?
व्याज = (म x द x क) : 100
= (500 x 8 x 3) : 100
व्याज= 120 रु.
म्हणून पर्याय क्र. 120 बरोबर

(4) स्वराने दसादशे 7 दराने 20000 रुपयांचे 5 वर्षासाठी बॅँकेत ठेवले, तर तिला किती व्याज मिळेल? (2017)
(1) 5000 (2) 700 (3) 7000 (4) 500
स्पष्टीकरण = म =20000, द = 7, क = 3
व्याज = ?
व्याज = (म x द  x क)x 100
= (20000 x 7 x 5) : 100
व्याज = 7000 रु.
पर्याय क्र. 3 बरोबर

नमुना प्रश्न :

(1) दसादशे 8 दराने 5000 रु. मुद्दलावर 3 वर्षाचे व्याज किती?
(1) 1200 (2) 1400 (3) 1250 (4) 1120

(2) एका बॅँकेमध्ये 12500 रुपयांचे 4 वर्षात 15500 होतात, तर व्याजाचा दर किती?
(1) 3 % (2) 4 % (3) 5 % (4) 6%

(3) दसादशे 12 दराने 5000 रुपयांचे अडीच वर्षाचे व्याज किती?
(1) 150 (2) 1500 (3) 750 (4) 1200

(4) 10 दराने एका रकमेचे किती वर्षात दामदुप्पट होईल?
(1) 5 (2) 10 (3) 20 (4) 3

(5) अनिलने दसादशे 12 दराने 5000 रु. मुद्दल कर्जाऊ घेतले, तर 3 वर्षांनी त्याला किती सरळव्याज द्यावे लागेल?
(1) 600 (2) 1800 (3) 1200 (4) 1506

(6) मुद्दल 8500 रु. व व्याज 1200 रु. असल्यास रास किती?
(1) 9700 (2) 9000 (3) 9500 (4) 9200

(7) दसादशे 12 दराने 4000 रुपयांचे किती वर्षात 1440 रु. सरळव्याज होईल?
(1) 3 (2) 2 (3) 4 (4) 1

(8) दसादशे 13 दराने 4000 रु. मुद्दलाचे दोन वर्षाचे सरळव्याज किती होईल?
(1) 520 (2) 1040 (3) 1400 (4) 1080

(9) दसादशे काही दराने 3020 रुपयांचे 3 वर्षांचे सरळव्याज 1080 रु. होते, तर व्याजाचा दर किती ?
(1) 36 (2) 24 (3) 12 (4) 18

(10) एक रकमेची रास 6300 रु व व्याज 540 रु आहे, तर मुद्दल किती?
(1) 5700 (2) 5760 (3) 5707 (4) 6940

उत्तर सूची : 

(1) 1 (2) 4 (3) 2 (4) 2 (5) 2 (6)1 (7) 3 (8) 2 (9) 3 (10) 2

 

जिल्हा परिषद शाळा खरशिंग ता. कवठेमहांकाळ
























 

Web Title: Etc. 5th scholarship examination, subject mathematics. Component- DirectView

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.