यंदा सरकारला फक्त ३0,६५९ कोटींचा लाभांश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 12:39 AM2017-08-12T00:39:47+5:302017-08-12T00:39:58+5:30

२0१६-१७ या वित्त वर्षासाठी रिझर्व्ह बँकेकडून भारत सरकारला केवळ ३0,६५९ कोटी रुपयांचा लाभांश दिला जाणार आहे. गेल्या वर्षी रिझर्व्ह बँकेने ६५,८७६ कोटी रुपयांचा लाभांश दिला होता.

 This year, the government has given only Rs 30,659 crore dividend | यंदा सरकारला फक्त ३0,६५९ कोटींचा लाभांश

यंदा सरकारला फक्त ३0,६५९ कोटींचा लाभांश

 नवी दिल्ली : २0१६-१७ या वित्त वर्षासाठी रिझर्व्ह बँकेकडून भारत सरकारला केवळ ३0,६५९ कोटी रुपयांचा लाभांश दिला जाणार आहे. गेल्या वर्षी रिझर्व्ह बँकेने ६५,८७६ कोटी रुपयांचा लाभांश दिला होता.
लाभांशामध्ये घट का झाली, याचे कोणतेही कारण बँकेने दिलेले नाही. अर्थतज्ज्ञांनी सांगितले की, नोटाबंदीमुळे बँकेला नव्या नोटांची छपाई करावी लागली. त्यावरील खर्चामुळे लाभांशात घट झाली. नोटाबंदीमुळे जुन्या नोटांच्या जागी ५00 आणि २,000 रुपयांच्या नव्या नोटा छापण्यात आल्या होत्या.
सूत्रांनी सांगितले की, यंदाचा लाभांश २0११-१२ नंतरचा सर्वाधिक कमी लाभांश ठरणार आहे. त्या वर्षी १६,0१0 कोटींचा लाभांश रिझर्व्ह बँकेने दिला होता. २0१२-१३ मध्ये ३३,0१0 कोटींचा लाभांश दिला होता. रिझर्व्ह बँकेचे वित्तवर्ष जुलै ते जून असे असते. २0१२-१३ मध्ये मालेगाम समितीने रिझर्व्ह बँकेकडील संपूर्ण शिल्लक सरकारकडे हस्तांतरित करण्याची शिफारस केली होती, तेव्हापासून रिझर्व्ह बँक आपल्याकडील सर्व शिल्लक सरकारकडे हस्तांतरित करते.
२0१७-१८ च्या अर्थसंकल्पात सरकारने रिझर्व्ह बँक आणि राष्टÑीयीकृत बँकांकडून ७४,९0१ कोटी रुपयांचा लाभांश मिळेल, असा अंदाज व्यक्त केला आहे. त्यात रिझर्व्ह बँकेचा वाटा ५८ हजार कोटी इतका गृहीत धरण्यात आला आहे.

एसबीआयचा नफा तिपटीपेक्षा जास्त वाढला
जूनला संपलेल्या तिमाहीत स्टेट बँक आॅफ इंडियाचा नफा तिपटीपेक्षा जास्त वाढून ३,१0५.३५ कोटी रुपये झाला. गेल्या वर्षी याच अवधीत बँकेचा नफा ८६७.३२ कोटी होता. १ एप्रिल २0१७ रोजी एसबीबीजे, एसबीएम, एसबीटी, एसबीपी आणि एसबीएच या सहयोगी बँकांचे, तसेच महिला बँकेचे एसबीआयमध्ये विलीनीकरण झाले होते. त्यानंतरच्या पहिल्याच तिमाहीत बँकेचा नफा वाढला. तथापि, याच काळात बँकेच्या एनपीएमध्ये ९.९७ टक्क्यांची वाढ झाली.

नोटाबंदीचा खर्च नोंद करा
माजी वित्तमंत्री पी. चिदंबरम यांनी टिष्ट्वट करून सरकारला खिजवले. नोटाबंदीचा आणखी ५0 हजार कोटींचा खर्च नोंदवा, असे त्यांनी म्हटले. चलनातून बाद करण्यात आलेल्या नोटा नष्ट करणे आणि नव्या नोटा छापून चलनात आणणे यावर किती खर्च आला, याची माहिती रिझर्व्ह बँक देईल का, असा सवालही चिदंबरम यांनी केला.

Web Title:  This year, the government has given only Rs 30,659 crore dividend

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.