नागसेन व्याख्यानमाला : व्याख्यानाच्या माध्यमातून वैचारिक चळवळ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 12:27 AM2018-04-13T00:27:04+5:302018-04-13T00:29:02+5:30

नागसेनवन परिसरातील विद्यार्थी आणि शहरातील पुरोगामी विचाराच्या नागरिकांचे वैचारिक विश्व व्यापक करण्याची चळवळ नागसेन व्याख्यानमालेच्या माध्यमातून गेली १२ वर्षांपासून नियमितपणे राबविण्यात येत आहे.

Nagasen lecture series: Conceptual movement through lecture | नागसेन व्याख्यानमाला : व्याख्यानाच्या माध्यमातून वैचारिक चळवळ 

नागसेन व्याख्यानमाला : व्याख्यानाच्या माध्यमातून वैचारिक चळवळ 

मिलिंद महाविद्यालयाचा परिसर अर्थात नागसेनवन ही भूमी केवळ शैक्षणिक चळवळीचेच केंद्र म्हणून नव्हे, तर आंबेडकरी आणि धम्म चळवळीचेही केंद्र म्हणून संपूर्ण देशाला परिचित आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पदस्पर्श लाभलेल्या या भूमीत नागसेन व्याख्यानमालेच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तनाच्या लढ्याला नेहमीच मोठी चालना मिळत आली आहे. 

यासंदर्भात पीईएस अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अभिजित वाडेकर सांगतात, नागसेनवन परिसरातील विद्यार्थी आणि शहरातील पुरोगामी विचाराच्या नागरिकांचे वैचारिक विश्व व्यापक करण्याची चळवळ नागसेन व्याख्यानमालेच्या माध्यमातून गेली १२ वर्षांपासून नियमितपणे राबविण्यात येत आहे. या देशाचे घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटी संचलित पीईएस अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये २००१ पासून नियमितपणे जयंती उत्सव साजरा केला जात होता. 

महाविद्यालयातील संपूर्ण स्टाफ आणि विद्यार्थी या उत्सवात सहभागी होत असत. मिरवणुकीमध्येही दरवर्षी अनोखा देखावा सादर केला जात असे. तेव्हा मिलिंद विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. ए. वाहूळ यांनी नागसेन व्याख्यानमाला सुरू केली होती. प्राचार्य डॉ. वाहूळ सेवानिवृत्त झाल्यानंतर पुढे ती काळाच्या ओघात बंद पडली. 

मागे वळून पाहिले तर अलीकडे करमणुकीची साधने वाढली, माहितीचा स्फोट झाला. जगभरातील घटना, घडामोडी टीव्हीच्या माध्यमातून घरबसल्या पाहता येऊ लागल्या. प्राईम टाईमच्या मालिका सोडून व्याख्याने ऐकण्यासाठी श्रोत्याला खेचून आणण्यात संयोजकांच्या कल्पकतेचा कस लागत आहे. नागसेन व्याख्यानमाला मात्र, याला अपवाद ठरली आहे. दरवर्षी या व्याख्यानमालेला श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. 

पीईएस अभियांत्रिकी महाविद्यालयात २००५-०६ पासून मिरवणुकीतील सहभाग बंद केला आणि नागसेन व्याख्यानमालेचे आयोजन सुरू केले. तेव्हापासून आजपर्यंत दरवर्षी अखंडपणे या व्याख्यानमालेचे आयोजन केले जाते. सुरुवातीचे तीन वर्षे स्थानिक पातळीवर वक्त्यांना निमंत्रित केले. त्यानंतर राज्यपातळीवरील व अलीकडे २०१२ पासून राष्ट्रीय पातळीवरील वक्त्यांना व्याख्यानमालेसाठी निमंत्रित केले जाते. या माध्यमातून ‘बिखरता लोकतंत्र और वर्तमान सरकार की नितिया’ यासारख्या देशपातळीवरील विषयांवर विचारमंथन केले जाते. 

Web Title: Nagasen lecture series: Conceptual movement through lecture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.