विदर्भात राष्ट्रवादीची ताकद वाढलेली दिसेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 10:16 PM2018-10-22T22:16:56+5:302018-10-22T22:17:09+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसची पश्चिम महाराष्ट्रात पुर्वीपासून ताकद आहे. आता विदर्भातही राष्ट्रवादीची ताकद आगामी निवडणुकीत वाढलेली दिसेल आणि राष्ट्रवादी महाराष्ट्र क्रमांक एकचा पक्ष राहील, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार अ‍ॅड. जयदेव गायकवाड यांनी येथे पत्रकार परिषदेत केला.

Vidarbha will see NCP's strength increased | विदर्भात राष्ट्रवादीची ताकद वाढलेली दिसेल

विदर्भात राष्ट्रवादीची ताकद वाढलेली दिसेल

Next
ठळक मुद्देजयदेव गायकवाड : राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचा दावा

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : राष्ट्रवादी काँग्रेसची पश्चिम महाराष्ट्रात पुर्वीपासून ताकद आहे. आता विदर्भातही राष्ट्रवादीची ताकद आगामी निवडणुकीत वाढलेली दिसेल आणि राष्ट्रवादी महाराष्ट्र क्रमांक एकचा पक्ष राहील, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार अ‍ॅड. जयदेव गायकवाड यांनी येथे पत्रकार परिषदेत केला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामाजिक न्याय विभागातर्फे विदर्भ दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या दौºयांतर्गत प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड. गायकवाड भंडारा येथे आले असता येथील विश्राम भवनावर ते पत्रकारांशी बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मायावी चेहरा आहे. त्यांचा खरा चेहरा संघाचा आहे. यावरून बाबासाहेब आंबेडकरांबद्दल प्रेमाचा आव आणत असले तरी चार वर्षात इंदू मिल येथील बाबासाहेबांच्या स्मारकाच्या जागेवर साधी विटही लागली नाही. ही सर्वसामान्य जनतेच्या डोळ्यात धूळफेक असल्याचे त्यांनी सांगितले. जंतर मंतरवर राज्यघटनेची झालेली होळीही ६८ वर्षात पहिलीच घटना होती. या घटनेनंतर जबाबदार मंत्र्यांनी बेजाबाबदारीचे वक्तव्य केले. घटनेबाबत त्यांची भूमिका विचारी असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपा सरकारने नोटबंदी करून देशाला आर्थिक मंदीच्या खाईत लोटले आहे. याचा बदला आगामी निवडणुकात घेतला जाईल. पेट्रोल दरवाढीने अनेक प्रश्न निर्माण झाले असून सर्वसामान्य जनता हवालदिल आहे. आता देशातील शेतकरी निवडणुकांची प्रतिक्षा करीत असून त्यात सरकारचा हिशेब चुकता करेल, असे त्यांनी सांगितले.
यावेळी खासदार मधुकर कुकडे, प्रदेश उपाध्यक्ष पंडित कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव धनंजय दलाल, जिल्हाध्यक्ष डॉ. रवींद्र वानखडे उपस्थित होते.

Web Title: Vidarbha will see NCP's strength increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.