पहिल्याच दिवशी ४७ नामनिर्देशन अर्जांची उचल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 10:56 PM2019-03-18T22:56:16+5:302019-03-18T22:56:46+5:30

लोकसभा निवडणुकींतर्गत भंडारा - गोंदिया मतदार क्षेत्रातून नामनिर्देशन पत्र स्विकारण्याच्या प्रक्रियेत सोमवारी पहिल्याच दिवशी २० उमेदवारांनी ४७ नामनिर्देशन अर्जांची उचल केली. दुसरीकडे लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांनी निवडणूक कामाच्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, निवासी उपजिल्हाधिकारी विजय भाकरे, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) प्रमोद भुसारी उपस्थित होते.

On the very first day, the withdrawal of 47 nominations | पहिल्याच दिवशी ४७ नामनिर्देशन अर्जांची उचल

पहिल्याच दिवशी ४७ नामनिर्देशन अर्जांची उचल

googlenewsNext
ठळक मुद्देरणधुमाळी लोकसभेची : जिल्हा प्रशासन सज्ज, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : लोकसभा निवडणुकींतर्गत भंडारा - गोंदिया मतदार क्षेत्रातून नामनिर्देशन पत्र स्विकारण्याच्या प्रक्रियेत सोमवारी पहिल्याच दिवशी २० उमेदवारांनी ४७ नामनिर्देशन अर्जांची उचल केली. दुसरीकडे लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांनी निवडणूक कामाच्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, निवासी उपजिल्हाधिकारी विजय भाकरे, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) प्रमोद भुसारी उपस्थित होते.
निवडणूक आयोगाच्या निदेर्शानुसार नामनिर्देशनपत्रे २५ मार्च पर्यंत (सार्वजनिक सुटी व्यतिरीक्त) सकाळी ११ ते दुपारी ३ वाजतापर्यंत स्विकारले जाणार आहेत. उमेदवारांना नामनिर्देशन पत्र विहीत नमुना २ अ मध्ये सादर करणे आवश्यक आहे. उमेदवार मान्यताप्राप्त राजकीय पक्षाचे असल्यास एक प्रस्तावक आवश्यक आहे. दरम्यान ११ एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. भंडारा येथे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांचे वतीने निवडणूकीशी संबंधित अधिकारी व कर्मचाºयांना पोलीस बहुउद्देशिय सभागृहात निवडणूक कामकाजाचे प्रशिक्षण देण्यात आले.
अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख २५ मार्च
नामनिर्देशन पत्र सादर करावयाच्या अंतिम दिनांकास दुपारी ३ वाजतापर्यंत सादर करणे आवश्यक आहे. २५ मार्च रोजी दुपारी ३ वाजतापर्यंत नामनिर्देशन अर्ज स्विकारली जाणार आहेत. मतदारसंघ राखीव असल्यास नामनिर्देशन पत्रासोबत सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेले जातीचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. अमानत रक्कम सर्वसाधारण उमेदवारांसाठी २५ हजार व अनुसूचित जाती - जमातीसाठी १२ हजार ५०० रुपयेप्रमाणे आवश्यक आहे. अनामत रक्कम रोख किंवा शासकीय कोषागार येथे चालानद्वारे भरावी, धनादेश स्विकारले जाणार नाही. नामनिर्देशन पत्रासोबत रोख रक्कमेची पावती, चालान सादर करणे आवश्यक आहे. एक व्यक्ती जास्तीत-जास्त चार नामनिर्देशन पत्रे सादर करु शकतात.

Web Title: On the very first day, the withdrawal of 47 nominations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.