भंडारा जिल्ह्यात पाण्याची जुनी टाकी तोडताना खाली कोसळून दोन मजूर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2019 04:17 PM2019-05-28T16:17:33+5:302019-05-28T16:18:00+5:30

पाणी पुरवठा योजनेची जुनी टाकी तोडताना स्लॅबसह खाली कोसळून दोन मजूर गंभीर जखमी झाल्याची घटना लाखांदूर येथे मंगळवारी दुपारी १२.३० वाजता घडली.

Two laborers injured in collapsing while breaking old tank of water in Bhandara district | भंडारा जिल्ह्यात पाण्याची जुनी टाकी तोडताना खाली कोसळून दोन मजूर जखमी

भंडारा जिल्ह्यात पाण्याची जुनी टाकी तोडताना खाली कोसळून दोन मजूर जखमी

Next
ठळक मुद्देलाखांदूर येथील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : पाणी पुरवठा योजनेची जुनी टाकी तोडताना स्लॅबसह खाली कोसळून दोन मजूर गंभीर जखमी झाल्याची घटना लाखांदूर येथे मंगळवारी दुपारी १२.३० वाजता घडली.
प्रमोद मडावी (२७), अजय लोखंडे (२५) दोघे रा. पिंपळगाव कोहळी अशी जखमीची नावे आहे. पाणीपुरवठा योजनेची जुनी टाकी जीर्ण झाल्याने ती मंगळवारी तोडण्यात येत होती. प्रमोद व अजय ड्रिल मशीनने टाकीचा स्लॅब तोडत होते. अचानक स्लॅबसह दोघेही उंचावरून खाली कोसळले. त्यात ते गंभीर जखमी झाले. गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत दोघांनाही लाखांदूरच्या ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. अधिक वृत्त लवकरच देत आहोत.

Web Title: Two laborers injured in collapsing while breaking old tank of water in Bhandara district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात