तुमसर-तिरोडा रेल्वे मार्ग असुरक्षित

By admin | Published: July 20, 2015 12:26 AM2015-07-20T00:26:46+5:302015-07-20T00:26:46+5:30

तुमसर तिरोडा रेल्वे मार्ग घनदाट जंगलातून जातो. सातपुडा पर्वत रांगेतील दगड फोडून रेल्वे मार्ग ब्रिटीशांनी तयार केला

Tumsar-Tiroda railway route is unsafe | तुमसर-तिरोडा रेल्वे मार्ग असुरक्षित

तुमसर-तिरोडा रेल्वे मार्ग असुरक्षित

Next

भुयारी मार्गात पाण्याची साठवणूक : पावसाळ्यात दरड कोसळण्याची शक्यता
तुमसर : तुमसर तिरोडा रेल्वे मार्ग घनदाट जंगलातून जातो. सातपुडा पर्वत रांगेतील दगड फोडून रेल्वे मार्ग ब्रिटीशांनी तयार केला होता. पावसाळ्यात येथे दरड कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. चार वर्षापूर्वी एक मोठा दगड रेल्वे ट्रॅकवर पडला होता. चालकाच्या प्रसंगावधानाने अपघात टळला होता. हे येथे उल्लेखनीय.
तुमसर रोड ते तिरोडी दरम्यान प्रवाशी गाड्या व मालवाहतूक गाड्या दररोज धावतात. ब्रिटीशकालीन हा रेल्वे मार्ग आहे. सातपुडा पर्वत रांगा व घनदाट जंगलातून हा रेल्वे मार्ग तयार करण्यात आला होता. मॅग्नीजची ने-आण करण्याकरिता हा रेल्वे मार्ग तयार केला होता.
डोंगरी बु. बाळापूर गावाजवळ एका दगडी बोगदयातून रेल्वे मार्ग जातो.
महाकाय दगड फोडून रेल्वे ट्रॅक येथे घालण्यात आला. पावसाळ्यात पाणी मुरुम भूसंखलनाचा मोठा धोका असतो. चार वर्षापूर्वी या रेल्वे ट्रॅकवर मोठा दगड पडला होता. सुदैवाने चालकाच्या प्रसंगावधाने तो अपघात टळला होता.
हा रेल्वे मार्ग यामुळे असुरक्षित मानला जात आहे. रेल्वे ट्रॅकवर दरड कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. दगडी बोगदा ६० ते ७० मीटर एवढा लांब आहे. वळणामय मार्ग असल्याने समोरचे दिसत नाही. रेल्वेच्या स्थापत्य विभागाने आधूनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करुन कायम स्वरुपी सुरक्षित उपाय योजना करण्याची गरज आहे.
या स्थळापासून शंभर मिटर अंतरावर फाटकाजवळ पायदळ भूयारी मार्ग तयार करण्यात येत आहे. रेल्वे मार्गावर भूयारी मार्ग तयार करण्यात येत आहेत तिथे पाणी साचण्याचा प्रकार सुरु आहे. अभियंत्यांनी येथे लक्ष देण्याची गरज आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Tumsar-Tiroda railway route is unsafe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.