पेट्रोल पंपावर द बर्निंग व्हॅनचा थरार; मोठा अनर्थ ठळला, भंडारामधील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 06:17 PM2021-08-12T18:17:53+5:302021-08-12T18:18:10+5:30

पेट्रोल भरताना टाकी ओव्हरफ्लो होऊन अचानक पेट घेतला.

The tremor of The Burning Van at the petrol pump; There was a big disaster, an incident in Bhandara | पेट्रोल पंपावर द बर्निंग व्हॅनचा थरार; मोठा अनर्थ ठळला, भंडारामधील घटना

पेट्रोल पंपावर द बर्निंग व्हॅनचा थरार; मोठा अनर्थ ठळला, भंडारामधील घटना

Next

भंडारा: पंपावर पेट्रोल भरताना व्हॅनने अचानक पेट घेण्याची घटना येथील बोसनगरातील पेट्रोल पंपावर गुरूवारी दुपारी घडली. पंपावरील कर्मचाऱ्यांनी क्षणाचा विलंब न लावता आग नियंत्रणात आणली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. तुमसर शहरात मुख्य मार्गावर बोसनगरात खंडेलवाल पेट्रोल पंप आहे. या पंपावर गुरूवारी दुपारी पेट्रोल भरण्यासाठी व्हॅन आली.

पेट्रोल भरताना टाकी ओव्हरफ्लो होऊन अचानक पेट घेतला. थोडा वेळ काय झाले काहीच कळले नाही. सदर घटनेने एकच खळबळ उडाली. प्रसंगावधान राखून पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांनी अग्निशामक उपकरणांचा वापर करून पाण्याचा मारा केला. त्यामुळे काही वेळातच आग नियंत्रणात आली. येथे पेट्रोल भरणाऱ्यासाठी आलेल्या वाहनधारकांची तारांबळ उडाली. या व्हॅनमध्ये गॅस सिलेंडर होता. मात्र कोणतीच अनुचित घटना घडली नाही.

Web Title: The tremor of The Burning Van at the petrol pump; There was a big disaster, an incident in Bhandara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.