ताजमेहंदी जन्मोत्सव यात्रा ठरली धार्मिक एकात्मतेचे प्रतिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2018 11:52 PM2018-01-14T23:52:38+5:302018-01-14T23:53:02+5:30

वरठीपासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या बीड सीतेपार गावात असलेले ताज मेहंदी बाबा दरबार आहे.

The symbol of religious integration reached the Tajmehandi on the birth anniversary of the journey | ताजमेहंदी जन्मोत्सव यात्रा ठरली धार्मिक एकात्मतेचे प्रतिक

ताजमेहंदी जन्मोत्सव यात्रा ठरली धार्मिक एकात्मतेचे प्रतिक

Next
ठळक मुद्देबीड-सीतेपार येथे तीन दिवसीय यात्रा : सर्वधर्म समुदायांच्या उपस्थितीत महोत्सव

तथागत मेश्राम ।
आॅनलाईन लोकमत
वरठी : वरठीपासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या बीड सीतेपार गावात असलेले ताज मेहंदी बाबा दरबार आहे. दरवर्षी तिळसंक्रांत निमित्त येथे तीन दिवसीय यात्रा भरते. तीन दिवसात ७० ते ८० हजार भाविक या यात्रेत येतात. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यापासून ते मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्यातून मोठ्या प्रमाणात भाविकांचा डेरे दाखल होतात.
मानव कल्याण व दु:ख निवारण्यासाठी ताज मेहंदी बाबाची शिकवण व सांगितलेल्या मार्गावर चालणाऱ्या शेकडो लोकांनी आपल्या जीवनाची घडी बसविली. शेकडोंनी व्यसन सोडले. ताज मेहंदी बाबांवर असलेल्या श्रद्धेपोटी जमणारी गर्दी ही दरवर्षी वाढत आहे. बीड सीतेपार येथे भरणारी यात्रा हे धार्मिक एकतेचे प्रतीक असून जात धर्म न पाळता येणारे भाविक त्यांची साक्ष देतात.
गोंदिया जिल्ह्यातील आमगाव येथील प्रभुदास बाळबुधे यांनी १९९४ ला मोहाडी तालुक्यातील बीड सीतेपार येथे तत्कालीन सरपंच स्वर्गीय माणिक बाळबुधे यांच्या सहकार्याने या मंदिराची पायाभरणी केली. सासूच्या आजाराने कंटाळलेल्या बाळबुधे यांनी खापरी येथे ताज मेहंदी बाबांची सेवा घेतली. त्यांच्या सेवेपासून लाभ मिळाल्यामुळे त्यांनी या सेवेचा प्रचार प्रसार केला. त्याचेच फलस्वरूप म्हणजे ताज मेहंदी बाबांच्या मृत्यू नंतरही मंदिर निर्माण करण्याचा संकल्प केला. अल्पावधीत या मंदिराला तीर्थक्षेत्राचे स्वरूप प्राप्त होऊन मोठ्या प्रमाणात येणारे भाविक व त्यांच्याकडून मिळणाऱ्या देणगीतून मंदिराला मोठे स्वरूप प्राप्त झाले. दरवर्षी भरणारी यात्रा व भाविकांची संख्या दखल शासनाने घेतली. ‘क’ दर्जाचे तिर्थक्षेत्र म्हणून घोषित केले. मंदिराकरीता शासनाकडून तीन एकर शेती मंदिर कमिटीला मिळाली आहे. तीर्थक्षेत्र विकास अंतर्गत भाविकांसाठी निवास, पिण्याच्या पाण्याची सोय व अन्य सुविधा करीत निधी देण्यात आला आहे. भाविकांकरिता निशुल्क निवास व्यवस्था संस्थांनाच्या वतीने करण्यात येते. दर गुरुवारला शेकडो भाविक या मंदिरात येतात. अनेक भाविक महिना महिना या मंदिर परिसरात मुक्कामाने राहतात. त्यांच्या निवासाची व्यवस्था संस्थानाच्या वतीने नि:शुल्क केली जाते.
ताज मेहंदी बाबा यांचा जन्म तिळसंक्रातीच्या दिवशी झाला व महाशिवरात्रीच्या दिवशी मृत्यू झाला होता. यामुळे या दिवसाला अनन्यसाधारण महत्व आहे. दरवर्षी बीड सीतेपार येथे तिळसंक्रांत पासून तीन दिवसीय यात्रेला सुरुवात होते. या जत्रेत महाराष्ट्रातील कानाकोपºयापासून ते मध्यप्रदेश व छत्तीगड राज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक येतात. त्यांच्या राहण्यासाठी मोठे शामियाना ची व्यवस्था करण्यात येते. कडाक्याच्या थंडीत शामियानात हजारो भाविक श्रद्धेने राहतात. तिळसंक्रांत पासून सुरु होणाºया यात्रेच्या दुसऱ्या दिवशी भाविकांची गर्दी लक्षणीय राहत असल्याची माहिती संस्थानचे अध्यक्ष प्रभुदास बाळबुधे यांनी दिली. यावेळी बीडचे सरपंच राजेश फुले, उपाध्यक्ष प्रवीण बावनकुळे, विनायक हटवार, सीताराम चावके, व तानबा दमाहे उपस्थित होते.
महाप्रसाद
यात्रेत विविध ठिकाणाहून भाविक महाप्रसाद वितरीत करतात. यात पंकज शिंदे, बंटी शेळके, नरेश शामकुवर, राजेश तिवारी, मनीष घोटेकर व जगनाथ चतुर्वेर्दी हे महाप्रसाद व ब्लँकेट वाटप करतात. संस्थनच्यावतीने महाप्रसाद देण्यात येतो. परिसरात ७० ते ८० हजार भाविक या महाप्रसादाचा लाभ घेतात.
एस टी महामंडळाची बस सुविधा
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या भाविकांसाठी भंडारासह साकोली, लाखनी, पवनी, तुमसर, नागपूर, चंद्रपूर, रामटेक, गोंदिया येथून बस सुविधा उपलब्द केल्या जातात. यंत्रे निमित्त दरवर्षी वाढणारी गर्दी लक्षात घेऊन बसेस सुविधा पुरवल्या जातात. यामुळे मोठ्या प्रमाणात एस टी महामंडळाचे आवक वाढते.
पोलिसांचा चोख बंदोबस्त
मोठ्या प्रमाणात येणाऱ्या भाविकांसाठी वरठी पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक सुरेश ढोबळे यांच्या मार्गदर्शनात एक पोलीस उपनिरीक्षक यांच्या १५ पोलीस कर्मचारी तीन दिवस तैनात आहे. यात महिला पोलीस कर्मचाºयांचा समावेश आहे.

Web Title: The symbol of religious integration reached the Tajmehandi on the birth anniversary of the journey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.